शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वंदे मातरम् बोलण्यास नकार देण्यात काहीच गैर नाही - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 13:05 IST

जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच गैर नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलले आहेत

ठळक मुद्दे'जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच गैर नाही''समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने 'वंदे मातरम्'चा मुद्या जाणुनबुजून उपस्थित केला जात आहे'अबू आझमी यांनी वंदे मातरम् बोलण्यास नकार दिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत वाद निर्माण झाला होता

कल्याण, दि. 1 - जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच गैर नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलले आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने 'वंदे मातरम्'चा मुद्या जाणुनबुजून उपस्थित केला जात असल्याचा आरोपही यावेळी रामदास आठवले यांनी केला आहे. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

'प्रत्येकाने वंदे मातरम् बोललं पाहिजे, पण जर एखादी व्यक्ती नाही बोलली तर त्यात चुकीचं काय ?', असा प्रश्न रामदास आठवले यांनी यावेळी उपस्थित केला. 'कोणी वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही', असं मत रामदास आठवले यांनी मांडलं. 

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेत वंदे मातरम् म्हणण्यावरून वाद निर्माण झाला होता. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले होते. त्यानंतर राज्याच्या विधानसभेत ‘वंदे मातरम्’चा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. 

वंदे मातरम् या गीतावरून सुरू असलेल्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतली होती. 'वंदे मातरम् हे गीत म्हणणं हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीशी निगडित आहे. जे लोक वंदे मातरम् हे राष्ट्रगीत गात नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही. मात्र वंदे मातरम् या गीताला विरोध करणं हेसुद्धा चुकीचेच आहे', असं नक्वी बोलले होते. 

केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री नक्वी बोलले होते की, 'राष्ट्रगीत म्हणणं एका व्यक्तीच्या आवडीशी संबंधित आहे, मात्र वंदे मातरमला विरोध करणं ही देशभक्ती ठरू शकत नाही. जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् गात नसल्यास ती व्यक्ती देशद्रोही किंवा राष्ट्रविरोधी असल्याचं ठरवू शकत नाही. वंदे मातरम् हे गीत गाणं हे व्यक्तीच्या स्वातंत्र्येचा एक भाग आहे. पण तरीही एखादी व्यक्ती जाणूनबुजून वंदे मातरमला विरोध करत असल्यास ती त्या व्यक्तीची मानसिकता दर्शवते'. 

काय झालं होतं विधानसभेत- औचित्याच्या मुद्द्यावर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या देशात राहून वंदे मातरम गायला विरोध केला जातोय. या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम म्हणावंच लागेल असं गोटे बोलले होते. यावर आझमींनी उत्तर देण्याची परवानगी मागितली होती. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. अबू आझमी वेलमध्ये उतरले. दोन्ही बाजूंनी  आमदारांच्या घोषणा सुरू होत्या.  

यानंतर आझमी यांनी इतिहासाचा दाखला दिला होता, 'देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं,  या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता ? सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत कोणी लिहिले ? शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय ? अफजल खानाच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते ? इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते ? त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत असं पसरवू नका, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा, हिंदुस्थान झिंदाबादचा नारा आम्ही एकवेळ नाही तर हजारवेळा देऊ, पण वंदे मातरम म्हणणार नाही', असं आझमी बोलले होते.

यानंतर एकनाथ खडसेंनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला होता. 'देशाच्या स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् या गीताने झाली आहे.  तर तुम्हाला आक्षेप का? मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला,मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार, इथलेच कफन घ्यावं लागणार, इथलीच हवा, इथलेच पाणी फुकट मिळतं मग त्या मातीला नमन करायला, या देशाला सलाम करायला काय अडचण आहे ? असं म्हणत खडसे यांनी इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहना होगा', असं ठणकावलं होतं. 

दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयाने सर्व सरकारी शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये मध्ये वंदे मातरम बोलणं सक्तीचं केलं आहे. आठवड्यातून एकदा तरी वंदे मातरम बोलणं सक्तीचं करण्यात आलं आहे.