शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुलंच्या साहित्याचा परवानगीविना वापर, आयुकाने धाडल्या दिग्दर्शक, कलाकारांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 07:08 IST

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा परवानगीविना वापर केल्याने इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)ने काही प्रथितयश कलाकार व दिग्दर्शकांना नोटिसा पाठविल्या आहेत.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा परवानगीविना वापर केल्याने इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)ने काही प्रथितयश कलाकार व दिग्दर्शकांना नोटिसा पाठविल्या आहेत. पुलंचे जन्मशताब्दी वर्ष उद्या, गुरुवारपासून सुरू होत आहे. या निमित्ताने स्वामित्व हक्कासंदर्भातील वादावर एकदाचा पडदा पडेल, अशी आशा आहे.पुलंच्या मृत्यूनंतर सुनीताबार्इंनी केवळ पुलंनी लिहिलेल्या नाटकांच्या हक्कांचे प्रयोग खुले केले होते. यातील एकही शब्द बदलण्याची परवानगी नाही, अशी अटही घातली होती. त्यांनी १० आॅगस्ट २००६ रोजी केलेल्या मृत्युपत्रानुसार, पुलंच्या साहित्याचे अधिकार आयुकाकडे सोपविले, पण पुलंच्या साहित्य, नाटकांचा वापर कोणत्याही परवानगीविना होत असल्याचे लक्षात आल्याने आयुकाने कलाकारांना संमती न घेतल्याबाबत नोटिसा पाठविल्या.पुलंची नाटके व इतर पुस्तकांचे सुनीताबार्इंकडे असलेले हक्क त्यांनी ‘आयुका’ला दिले. पुलंच्या पश्चात २००९ पर्यंत म्हणजेच सुनीताबार्इंच्या निधनापर्यंत पुलंच्या साहित्यावरील आधारित कार्यक्रम, चित्रपट, व्हिडीओ इत्यादी अनेक परवानग्या सुनीताबार्इंनी स्वत:च दिल्या होत्या.पुल आणि आचार्य अत्रे यांच्या निवडक कलाकृतींवर ‘आम्ही आणि आमचे बाप’ हा कार्यक्रम अजित परब, पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे आणि आनंद इंगळे सादर करतात. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे आहे. त्या कलाकारांना नोटिसा दिल्याचे समजते. मात्र, त्याचे प्रयोग सुरू आहेत. आयुकाकडून कोणतीही नोटीस आलेली नाही, असे अभिनेता पुष्कर श्रोत्री याने सांगितले. आयुकाचे निरंजन अभ्यंकर बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी व कलाकार अतुल परचुरे यांच्याशी संपर्क झाला नाही.आम्ही उत्तर पाठवले‘नमुने’ या हिंदी मालिकेबाबत आयुकाने नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीला उत्तरही पाठवण्यात आले आहे. आयुका अत्यंत सन्माननीय संस्था आहे. त्यामुळे याबाबतीत अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. - नितीन वैद्य, दिग्दर्शक.

टॅग्स :marathiमराठी