शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाचा समारोप नव्हे, मराठी भाषा संवर्धनाची सुरुवात : डॉ. विजय दर्डा 

By विजय दर्डा | Updated: February 24, 2025 10:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप हा समारोप ...

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप हा समारोप नसून मराठी भाषा संवर्धन करण्याची सुरुवात असल्याचे मत लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी समारंभात व्यक्त केले. मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी भाषेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सरकारने तातडीने पाउले उचलण्याची गरज आहे. मराठी माणूस पराक्रमी आणि कर्तबगार आहे. महाराष्ट्र हा भारताचा आधार आहे. त्यामुळे मराठी माणसाने महाराष्ट्र धर्म जपणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

लोकमत वृत्तपत्राचे तीन कोटी वाचक आहेत. लोकमत दिल्लीतूनही प्रकाशित होतो आहे. यास वाचकांचा पाठिंबा मिळत असल्याचा आनंद आहे. याचा अर्थ लोक मराठी वाचतात. मात्र, पुढच्या पिढ्यांनी मराठी बोलावी आणि त्यांचे मराठीशी नाते घट्ट व्हावे यासाठी आपण काय करीत आहोत? हा खरा मुद्या आहे. ३६ जिल्ह्यांच्या महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांत ललित साहित्याचे एकही दुकान असू नये? विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यात पुस्तकाचे एकही दुकान नाही. ग्रंथालये आधीच कमी आहेत. असतील तर अनुदान कमी आहे. ते सुद्धा वेळेवर मिळत नाही. मग वाचन संस्कृती कशी वाढणार? याकडे डॉ. दर्डा यांनी लक्ष वेधले.

आतापर्यंत तीन, चार महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे याचे उत्तर देवू शकतील, असे डॉ. दर्डा यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मराठी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळत नाही शाळा आणि भाषा या दोन्ही गोष्टी शिंदे साहेबांकडे आहेत आणि पैसे द्यायला अजितदादा तयार आहेत. यासाठी शासनाने आणखी काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळत नाही. याउलट इंग्रजी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळते? असा मुद्दा डॉ. दर्डा यांनी उपस्थित करताच सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला.

हे संमेलन ऐतिहासिकपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम या संमेलनाला केले आहे. यामुळे मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक आहे. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. यासाठी संजय नहार यांचे कौतुक करायला हवे. 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ