शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीवेळी राज्याला ठेंगा; महायुतीला मात्र भरभरून निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 06:16 IST

केंद्र सरकारने ग्रामसडक योजनेचा निधी दोन वर्षे दिलाच नाही

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत २०२०-२१ आणि २०२१-२२ या कालावधीत केंद्र सरकारकडून एक पैसाही न मिळालेले कदाचित महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावे. या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार येताच २०२२-२३ मध्ये केंद्र सरकारने ७४३ कोटींचा निधी मंजूर केला.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २००० मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. अवघ्या काही वर्षात तिची लोकप्रियता व उपयोगिता वाढली होती. योजनेतील कामगिरी आणि राज्याच्या वाटाचा खर्च केलेला निधी, यानुसार या योजनेत निधी वितरित केला जातो. केंद्र सरकारने देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना २०२०-२१ एकूण १३,६५१ कोटी रुपये आणि २०२१-२२ मध्ये १३,९५२ कोटी रुपये मंजूर केले. मात्र महाराष्ट्राला एकही रुपया मिळाला नाही. २०२३-२४ या वर्षाच्या जुलैपर्यंत २७६ कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला. 

...तरीही राज्यात २७ हजार किलोमीटरची कामेनिधीच्या अनुपलब्धतेमुळे महाराष्ट्राला ग्रामीण भागात रस्ते बांधण्यात अडचण आली नाही. राज्यांत २७,००० किलोमीटरचे ग्रामीण रस्ते पूर्ण झाले. राजकीय विरोधक राज्य सरकारचे नेतृत्व करीत असल्यामुळे महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. २०२२-२३ मध्ये स्थितीत कमालीची सुधारणा झाली आणि केंद्र सरकारने ७४३ कोटी रुपये दिले.

काही राज्यांनाही निधी नाहीnसंबंधित दोन वर्षांमध्ये या योजनेत आसाम, जम्मू- काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरला सर्वाधिक निधी मिळाला.n२०२०-२१ मध्ये काही राज्यांना केंद्रीय निधी मिळाला नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत; परंतु त्यांना २०२१-२२ मध्ये पुरेशी भरपाई देण्यात आली.nहरयाणाला २०२०-२१ मध्ये एकही पैसा मिळाला नव्हता. मात्र, त्याच्या पुढील वर्षी ३५३ कोटी रुपये दिले.

कोणतेही राजकारण नाहीप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून निधी वितरीत करताना त्यामागे काही राजकीय डावपेच असल्याचा इन्कारही करण्यात आल्याचे सूत्रांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राप्रमाणे मागील दोन वर्षे हरयाणा, तेलंगणाला या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला नव्हता. मात्र पुढील वर्षात नव्याने निधी मिळाला. पुढील २०२३-२४ वर्षांत जुलैपर्यंत महाराष्ट्राला पावणे तीनशे कोटींची निधी वितरित केला आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी