शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘थकीत वसुलीची जबाबदारी संरक्षण शाखेची नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 05:03 IST

विविध सेलिब्रिटी व बिल्डरांना सुरक्षेच्या कारणास्तव, सशस्त्र संरक्षण पुरविणा-या मुंबई पोलीस दलातील संरक्षण शाखेकडे त्यांच्याकडील शुल्काच्या थकबाकी वसुलीची जबाबदारी नसल्याची कबुली उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली.

जमीर काझी मुंबई : विविध सेलिब्रिटी व बिल्डरांना सुरक्षेच्या कारणास्तव, सशस्त्र संरक्षण पुरविणा-या मुंबई पोलीस दलातील संरक्षण शाखेकडे त्यांच्याकडील शुल्काच्या थकबाकी वसुलीची जबाबदारी नसल्याची कबुली उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली. त्यांच्याकडून शुल्क वसुुली करण्यासाठी जिल्हाधिका-यांशी पत्रव्यवहार केला जातो. मात्र, त्याच्या पाठपुराव्यासाठी निर्धारित मुदत किंवा कसलीही नियमावली नसल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षणाच्या बदल्यातील ५ कोटी २१ लाख रुपयांचे शुल्क थकविणा-या ३२ जणांचे संरक्षण हटविण्यात आले आहे. त्यामध्ये सिनेकलाकार, उद्योगपती, बिल्डर व काही राजकारण्यांचा समावेश आहे.माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरातील विविध क्षेत्रांतील एकूण १३३ खासगी व्यक्तींना बंदोबस्त पुरविण्यात येत आहे. त्याशिवाय ३२ जणांकडे ३० सप्टेंबरपर्यंत तब्बल ५ कोटी २१ लाख २२ हजार ३२८ रुपये थकबाकी असल्याचे उघडकीस आले होते. त्यात काही राजकीय नेते, उद्योगपती, बिल्डर व कलाकारांचाही समावेश असल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यांची नावे व वसुलीबाबतचा तपशील न दिल्याने, प्रथम अपील दाखल करण्यात आले होते. त्याबाबत अपील अधिकारी व उपायुक्त विनायक देशमुख यांच्याकडे झालेल्या सुनावणीत त्यांनी सांगितले की, ‘सुरक्षेच्या कारणास्तव संबंधितांची माहिती देऊ शकत नाही.शुल्क वसुलीची जबाबदारी संरक्षण शाखेची नसून जिल्हाधिकाºयांवर असते. त्यासाठी कालमर्यादा, पत्रव्यवहार, स्मरण पत्रे पाठविण्यासाठी कालावधीबाबत कसलेही नियम नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता,’ अशी धक्कादायक कबुली देत, शुल्क थकविणाºयाला संरक्षण काढून घेण्याशिवाय अन्य कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.>पोलीस आयुक्तांकडून आलेल्या प्रस्तावानुसार संरक्षण विभागाकडून संबंधित खासगी व्यक्तींना संरक्षण पुरविले जाते. मात्र संरक्षणाचे शुल्क वसुलीची जबाबदारी आमची नाही. त्यांच्या वसुलीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले जाते. मात्र त्यासाठीही निश्चित कालावधी, स्मरणपत्रे पाठविण्याबाबत काहीही नियम नाहीत.-विनायक देशमुख (पोलीस उपायुक्त, संरक्षण शाखा)>ंसंरक्षण शाखेच्या उपायुक्तांनी दिलेल्या कबुलीमुळे, शुल्क थकविणाºयांना ‘सेलिब्रिटी’कडील वसुलीसाठीचा पाठपुरावा हा अधिकाºयांच्या मर्जीवरच अवलंबून असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यासाठी पत्रे, स्मरणपत्रे पाठविण्याचा निर्णय त्यांच्या सोयीनुसार घेतला जात आहे. मुंबई पोलिसांकडून १३३ खासगी व्यक्तींना सुरक्षा पुरविले जाते. त्यामध्ये १३ खासदार, ४७ आमदार व एका नगरसेवकाचा समावेश आहे.

टॅग्स :Policeपोलिस