शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधीच नव्हे तर करीम लालाची भेट राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेही घ्यायचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 11:52 IST

सलीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले होते की, काँग्रेस निवडणुका जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेत होते.

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याची भेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली होती, असा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राऊत यांनी आपले विधान मागे घेतले आहे. मात्र करीम लालाची भेट केवळ इंदिरा गांधीच नव्हे तर माजी पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनीही घेतल्याचा दावा करीम लालाचे नातू सलीम खान यांनी  केला आहे. 

संजय राऊत यांच्या वक्तव्याने गदारोळ झाल्यानंतर सलीम खान यांनी हा दावा केला आहे. राऊत म्हणाले होते की, करीम लाला याची भेट अनेक नेते घेत होते. इंदिरा गांधी यांनी देखील करीम लालाची भेट घेतली आहे. यावर सलीम खान म्हणाले की, केवळ इंदिरा गांधीच नव्हे तर राजीव गांधी, शरद पवार, बाळ ठाकरे या दिग्गज नेत्यांशी करीम लाला यांची भेट होत असे. 

दरम्यान करीम लाला यांना भेटालयला इंदिरा गांधी मुंबईत आल्या होत्या हे म्हणणे चुकीचे आहे. मात्र त्यांची भेट दिल्लीत झाली होती. याचे फोटो आजही उपलब्ध आहेत. करीम लाला पठानांचे नेते होते. पठाण समुदायाला अडचण आल्यास, करीम लाला नेहमीच नेत्यांना भेटून त्या अडचणी सोडवत होते.सलीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले होते की, काँग्रेस निवडणुका जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेत होते. त्यावर सलीम म्हणाले की, करीम लाला हे एक व्यापारी होते. त्यांच्या मनात पठान समुदायासाठी आदर होता. राजकारणात जावं अस त्यांना कधीही वाटत नव्हतं. त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते की, ते राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसे पुरवतील. संजय राऊत यांच्या वक्तव्याची तोडमोड करून ते सादर केल्याचा दावाही सलीम यांनी केला.