शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

नळात नाही; डोळ्यात पाणी

By admin | Updated: June 9, 2014 01:27 IST

सूर्य आग ओकत असल्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत असून तेवढय़ाच वेगाने पाणी टंचाईची समस्याही भीषण स्वरूप धारण करीत आहे. एक-दोन नाही तर अख्ख्या शहरभरातील शेकडो वस्त्यांमध्ये

उन्हाळ्याचा प्रकोप : नागरिक म्हणतात जगावे कसे?नागपूर : सूर्य आग ओकत असल्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत असून तेवढय़ाच वेगाने पाणी टंचाईची समस्याही भीषण स्वरूप धारण करीत  आहे. एक-दोन नाही तर अख्ख्या शहरभरातील शेकडो वस्त्यांमध्ये पाण्याची चणचण जाणवत आहे. विशेषत: नळ पाईपलाईन नसलेल्या परिसरातील  परिस्थिती भयावह आहे. नागरिकांना पुरवून-पुरवून पाणी वापरावे लागत आहे. टँकरचे पाणी मिळविण्यासाठी भांडणे होत आहेत. बळाचा वापर करून  टँकर आपापल्या वस्तीकडे वळविण्याचे प्रयत्न होत आहेत. पाणी टंचाईवरून राजकारणही खेळले जात आहे. महानगरपालिकेवर मोर्चे काढले जात  आहेत. नळ पाईपलाईन असलेल्या ठिकाणीही फारशी चांगली परिस्थिती नाही. नियमित, शुद्ध व पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे  नागरिकांच्या डोळ्यांत  पाणी आले आहे.  अशा अवस्थेत जगावे कसे, हा एकच प्रश्न नागरिक विचारत आहेत. केवळ पाण्यासाठी!आशीनगर, नेहरूनगर व लकडगंज या तीन झोनमध्ये अक्षरश: पाणी पेटले आहे. या भागात सर्वाधिक पाणी समस्या आहे.  नळ पाईपलाईन असलेल्या  भागाचा विचार करता नेहरूनगरमध्ये ५७, आशीनगरमध्ये २१ व लकडगंजमध्ये १५, तर पाईपलाईन नसलेल्या भागाचा विचार करता लकडगंजमध्ये  ९५, आशीनगरमध्ये ९३ व नेहरूनगरमध्ये ३४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नागपूर शहराला पेंच व कन्हान जलाशयातून पाणीपुरवठा  केला जातो. प्रत्येक टाकीवर टँकरमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था आहे.  सध्या एक टँकर सरासरी ८-९  फेर्‍या करीत आहे.  उन्हाळ्यात खासगी  कंपन्या, संस्था, संघटना, लग्नसोहळे व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पाणी खरेदी केले जाते. यामुळे टँकरची मागणी आणखीच वाढली आहे.  झोपडपट्टय़ा, अविकसित ले-आऊट व मनपा हद्दीच्या सीमेवरील वस्त्यांमध्ये  लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.सार्वजनिक विहिरींची अवस्था वाईटशहरात  एकूण ७४0 सार्वजनिक विहिरी असून अनेक विहिरींची अवस्था वाईट आहे. शहरात क्वचित प्रसंगीच विहिरीवरून पाणी भरले जाते. यामुळे  उन्हाळ्यात विहिरीतील पाणी मोटारच्या मदतीने नागरिकांच्या घरापर्यंंंंत पोहोचविण्याची सोय केली जाऊ शकते. त्यासाठी पाणी शुद्ध ठेवणे आवश्यक  आहे. परंतु, बर्‍याच बारमाही विहिरी नियमित स्वच्छ केल्या जात नाही. परिणामी पाण्यात केरकचरा साचला आहे. पाणी दूषित झाले आहे. काही  विहिरी आटल्या आहेत. वर्षभर पाणी टिकण्यासाठी या विहिरी आणखी खोल करणे आवश्यक आहे. विहिरींचे पाणी उपयोगात आणले तर पाणी  टंचाईची भीषणता काही प्रमाणात कमी होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. विहिरी जिवंत ठेवण्यासाठी पाण्याचा उपसा करणे गरजेचे आहे.व्यर्थ जाते टँकरमधील पाणीजाणकारांच्या माहितीनुसार, पाणीपुरवठा करणारे सुमारे ३0 टक्के टँकर गळके असल्यामुळे रोज हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते. टँकरने पाणीपुरवठा  करण्यावर महापालिका वर्षाकाठी १३ ते १४ कोटी रुपये खर्च करते. परंतु, हजारो लिटर पाणी रोडवरच सांडून व्यर्थ जात असल्याने मनपाचे सुमारे ४  कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. टँकर लॉबीच्या दबावामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. पाण्याची भरमसाट बिले  आकारणार्‍या प्रशासनाने टँकरमधून गळणार्‍या पाण्याचा हिशेब देण्याची मागणी होत आहे. सुगतनगर म्हाडा कॉलनी सुगत नगर म्हाडा कॉलनीत पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. या कॉलनीत जलवाहिन्यांद्वारे घरोघरी नळ पोहचले आहे. मात्र नळाला पाणीच  नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  सकाळी उठल्यापासून कुटुंबातील प्रत्येकजणाची पाण्यासाठी वणवण सुरू होते. दोन  दिवसाआड कॉलनीत टँकर येतो. टँकर आला रे आला की लोकांची झुंबड उडते, उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी दररोज भांडण होत आहे. नारी नारी जुनी वस्तीत दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचे संकट निर्माण होते. येथे घरोघरी नळ पोहचले, मात्र टाकीवरून पाणीच सोडले जात नाही. वारंवार झोन  कार्यालयात तक्रारी केल्यावर कुठलातरी तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जाते. लवकरच समस्यांचे समाधान होईल सांगितले जाते. मात्र आजपर्यंंंंत  समस्या सुटल्या नाही. झोनच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा नळाला पाणी न सोडता टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यावर भर दिसतो आहे. सेमिनरी हिलसेमिनरी हिल परिसरातील जय बजरंग सोसायटी, मानवसेवा नगर या वस्त्या उंचावर असल्याने, येथे जलवाहिनीचे नेटवर्क असूनसुद्धा पर्याप्त पाणी  मिळत नाही. उन्हाळ्यात तर अवस्था अतिशय बिकट झाली आहे.  संध्याकाळी एक तास नळ येतो. मात्र धार कमी असल्याने केवळ पिण्याचे पाणी  मिळत आहे. वापरण्यासाठी आवश्यक असणारे पाणी टँकरशिवाय उपलब्ध नाही. टँकरही सहज येत नाही. परिसरात राहणारे सेवाराम हेडावू यांना  टँकरची आवश्यकता होती. मात्र दोन दिवसांपासून टँकर मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आज सुटी घेऊन टाकीवर जाऊन बसल्यानंतर त्यांना टँकर  मिळाला. मानेवाडारिंगरोडच्या पलीकडे येणार्‍या मानेवाडा परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात जलसंकटाचा सामना करावा लागतो.  या  भागातील बहुतांश नगरांमध्ये जलवाहिनीचे नेटवर्क आहे. मात्र दिवसभरात केवळ १५ ते २0 मिनिटे नळ सुरू राहतो. विज्ञान नगर, अभय नगर, शाहू  नगर, चिंतामणी नगर, जानकी नगर, न्यू अमरनगर, गुरुकुंजनगर, शेष नगर अवधूत नगर या परिसरातील काही भागात जलवाहिन्या नाही. येथील लोक  विहीर आणि बोअरवेलवर अवलंबून आहे. उन्हाळ्यात विहिरी आटल्या आहेत. बोअरला पाणी नाही. टँकर आठ आठ दिवस येत नाही. विशेष म्हणजे  या प्रभागातील नगरसेवक मनपाच्या जल समितीचे अध्यक्ष आहे. येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी पाण्यासाठी टँकर अडविले, नगरसेवकाच्या  घरासमोर मटकाफोड आंदोलन केले. मात्र पाण्यासाठी त्रास काही कमी झाला नाही.