पुणे : राज्यातील इतिहास असलेल्या एकाही किल्ल्याला नखमयही धक्का लागू देणार नाही. हा जो पर्यटन मंत्रालयाचा निर्णय झाला तो ज्या किल्ल्यांना इतिहास नाही त्यांच्या संदर्भात आहे. परंतु, या निर्णयाबाबत चुकीचे वृत्त पसरवले जात आहे , गड किल्ल्यांसंदर्भातील सरकारच्या निर्णयासंबधी उद्भवलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टोक्ती दिली.
इतिहास असलेल्या किल्ल्यांना नखभरही धक्का लागू देणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 20:13 IST
छत्रपतींचा, मराठ्यांचा इतिहास जिथे जिथे आहे. त्या किल्ल्यांना काहीही करण्याची परवानगी सरकार कधीच देणार नाही.
इतिहास असलेल्या किल्ल्यांना नखभरही धक्का लागू देणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठळक मुद्देपर्यटन मंत्रालयाकडून गड किल्ल्यांना भाडे तत्वावर देण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा