शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा चार दिवसात मिळाला : अब्दुल सत्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 12:47 IST

Abdul Sattar : बंडानंतर अब्दुल सत्तार आपल्या मतदार संघात जाण्यासाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात आमदार अब्दुल सत्तार सुद्धा होते. या बंडानंतर अब्दुल सत्तार आपल्या सिल्लोड मतदार संघात जाण्यासाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अब्दुल सत्तार म्हणाले, "मी अजून मतदारसंघात गेलो नाही, पण जिल्ह्यात आलो आहे. विशेष म्हणजे काही अनेक वर्षांची कामे राहिली होती. ती सर्व मुख्यमंत्र्यांकडे दीड-दोन वर्षांपासून खोळंबली होती, ती सर्व मार्गी लागून आलो. आता मतदार संघात जात आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यात जेवढा निधी मला मिळाला नाही, तेवढा या चार दिवसांत मिळाला आहे."

याचबरोबर, अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाबाबत सुद्धा भाष्य केले. ते म्हणाले, "खरं म्हणजे मला कॅबिनेट सुद्धा नाही आणि राज्यमंत्रीपद सुद्धा नाही. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येतात, किती खाती येतात, त्याप्रमाणे पुढील रुपरेषा आणि दिशा ठरविण्यात येईल. मला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही. माझ्याकडे सध्या खूप मोठे पद आहे, ते म्हणजे एका कार्यकर्त्याचे पद, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली होती. शिवसेनेत बंड पुकारलेल्या प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला होता. या मुद्द्यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आईची शपथ घेऊन सांगावे की खासदार होण्यासाठी किती कोटी दिले. असा थेट सवाल अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना केला आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदे