शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 07:38 IST

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार गुरुवारी साताऱ्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोन्ही पक्ष २००१ पासून सोबत काम करत आहेत. दोन्ही पक्षांची विचारधारा एक आहे. आम्ही लोकसभेच्या निवडणुकाही एकत्रित लढविल्या आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्र काम करणे गरजेचे असून, यापुढेही आम्ही एकत्र काम करणार आहोत. त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय नव्हताभाजपसोबत जाण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला होता, असे अजित पवार म्हणाले होते. माध्यमांनी या प्रश्नाबाबत छेडले असता शरद पवार म्हणाले, आमचा कोणताही निर्णय भाजपसोबत जाण्याचा नव्हता. आमची व भाजपची विचारधारा वेगळी आहे. आमच्यातील काही सहकारी भाजपमध्ये जाण्याच्या विचाराचे होते. मात्र, तो काही पक्षाचा निर्णय नव्हता.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार गुरुवारी साताऱ्यात आले होते. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएम या तीन पक्षांचे मिळून सहा खासदार निवडून आले. यंदा परिस्थिती वेगळी आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रातून इंडिया आघाडीचे ३० ते ३५ खासदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान पदाचा उमेदवार अजून निश्चित झाला नसल्याच्या टीकेवर, भाजपच्याच पक्षाचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधान पदाचा उमेदवार कुठे ठरला होता? असा सवाल केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार