शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेडी बंदरावरील जहाजातील चीनी प्रवाशांसह अन्य कोणाला कोरोनाची लक्षणे नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 20:48 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरावर सिंगापूर येथून आलेल्या मालवाहू जहाजावर असलेल्या १० चिनी व्यक्तींनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी चीन सोडले आहे.

 मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरावर सिंगापूर येथून आलेल्या मालवाहू जहाजावर असलेल्या १० चिनी व्यक्तींनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी चीन सोडले आहे. जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी मुंबई पोर्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली असून, त्यापैकी कोणालाही कसलीही लक्षणे नसल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत राज्यात भरती करण्यात आलेल्या ३६ पैकी ३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उरलेल्या ५ जणांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवासीही करोना करता निगेटिव्ह आढळला आहे . सध्या रुग्णालयात भरती असलेल्या ६ जणांपैकी प्रत्येकी २ जण मुंबई येथील कस्तुरबा आणि पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती आहेत तर प्रत्येकी १ जण नवी मुंबई आणि सांगली येथे दाखल आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.रेडी बंदरावर आलेल्या जहाजात एकूण २२ व्यक्ती आहेत. या जहाजाने ३ आठवड्यापूर्वी सिंगापूर सोडले आहे, तर यातील चिनी व्यक्तींनी सुमारे ३ महिन्यांपूर्वी चीन सोडलेले आहे.  रेडी बंदरावर पोहचल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक  यांच्या वैद्यकीय पथकाने देखील या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. या बोटीवरील कोणीही करोना संशयित नसून त्या बद्दल भीती बाळगण्याचे कारण नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २१ हजार २०३ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १५१ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ७२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाsindhudurgसिंधुदुर्गRedi portरेड़ी बंदर