शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात एकनाथ खडसे दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 06:22 IST

या जमिनीची बाजारभावानुसार किंमत ३१.०१ कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे.

मुंबई - पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्यात येणार असतानाही राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी गैरहजर राहिले. त्यामुळे विशेष खासदार-आमदार न्यायालयाने खडसे दाम्पत्याविरोधात शुक्रवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

सरकारी जमीन ही पदाचा गैरवापर करून पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे खरेदी करून दिल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्यावर आहे. या जमिनीची बाजारभावानुसार किंमत ३१.०१ कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे ईडीने खडसे दाम्पत्य आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालय काय म्हणाले?विशेष न्यायाधीश महेश जाधव यांनी सुनावणीस उपस्थित राहण्यास सूट देण्याचा खडसे यांचा अर्ज फेटाळताना म्हटले की, आरोप निश्चित करण्यात येणार असल्याचे आरोपीला माहीत होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खासदार-आमदार प्रकरणांचा निपटारा होणे अपेक्षित आहे. 

'ती' कारणे मान्य करण्यास न्यायालयाचा नकारखडसे दाम्पत्याने सुनावणीस गैरहजर राहण्यासाठी वैद्यकीय कारणे दिली होती. मात्र, न्यायालयाने ती कारणे मान्य करण्यास नकार दिला. अर्ज अत्यंत अस्पष्ट आहे. आरोपींना नेमकी कोणती वैयक्तिक अडचण आली, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तसेच दिलेल्या कारणांचे समर्थन वैद्यकीय कागदपत्रांशिवाय होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Non-bailable warrant issued against Khadse couple in Pune land scam.

Web Summary : Eknath Khadse and his wife face a non-bailable warrant for failing to appear in court regarding a money laundering case linked to the Bhosari land scam. The court rejected their reasons for absence, citing lack of specific details and supporting medical documents.
टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेCourtन्यायालय