शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

नापास उमेदवार बनला तोतया पोलीस; सरकारी खात्यांमध्ये नोकरीचे आमिष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 02:36 IST

पोलीस उपनिरीक्षक, स्टेशन इंचार्ज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या सहायक पोलीस आयुक्त असल्याचे भासवून, त्याने ६0 हून अधिक तरुणांची फसवणूक केली. ललित ओमप्रकाश सावंत (५४) असे प्रतापी तोतया पोलिसाचे नाव आहे. 

ठळक मुद्दे६0 हून अधिक तरुणांची केली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पदव्युत्तर शिक्षणानंतर पोलिसात भरती होण्यासाठी त्याने एमपीएससीची परीक्षा दिली. मात्र, तो परीक्षेत नापास झाला. खाकीच्या हौसेपोटी त्याने बाजारातून पोलिसांचा गणवेश विकत घेतला. त्यानंतर, पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, २ ते ५ लाखांमध्ये त्याने सरकारी खात्यांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक सुरू केली. या भूमिकेत तो स्वत:चीच बढती करत गेला. पोलीस उपनिरीक्षक, स्टेशन इंचार्ज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या सहायक पोलीस आयुक्त असल्याचे भासवून, त्याने ६0 हून अधिक तरुणांची फसवणूक केली. ललित ओमप्रकाश सावंत (५४) असे प्रतापी तोतया पोलिसाचे नाव आहे. ललितला यापूर्वीही अटक झाली होती. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याचा ठगीचा धंदा सुरूच  होता. अखेर गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने त्याला सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. विरार पश्‍चिमेत राहणार्‍या सावंतचे बोरीवलीत झेरॉक्सचे दुकान आहे. २00७ मध्ये त्याला वसई, तर २0१५ मध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यामध्ये तो उपनिरीक्षक, स्टेशन इंचार्ज आणि नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याचे भासवून फसवणूक करत असे. नोकरीच्या शोधात असलेल्या बोरीवलीतील एक तरुण सावंतच्या जाळ्यात अडकला. सहायक पोलीस आयुक्त असल्याचे भासवून, रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदावर नोकरी लावण्याचे आमिष त्याला दिले. त्याला कॉल लेटर, अपॉइंटमेंट लेटर, मेडिकल करून घेणे बाबतची बनावट कागदपत्रे देऊन त्याचा विश्‍वास संपादन केला. त्याच्याकडून ५ लाख ७५ हजार उकळले. मात्र, पैसे देऊनही नोकरीवर रुजू होण्याबाबत सावंत टाळाटाळ करत असल्याने, तरुणाने ५ फेब्रुवारी बोरीवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

कागदपत्रे ताब्यातसावंतच्या कारच्या झडतीत पोलीस युनिफॉर्म, बेल्ट, कप, युनिफॉर्मवर पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आढळून आले, तसेच त्याच्या घरातून रेल्वे, पालिका, पोलीसमधील पदाच्या भरती प्रक्रियेची कागपदत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत, तसेच अनेक उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतच्या फाइल्सही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

टॅग्स :Policeपोलिस