शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपन्यांनाच आरोग्य, वैद्यकीय विभागांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 04:01 IST

राज्य शासनाच्या सर्वच विभागांनी त्यांना लागणारी औषधांची मागणी हाफनिक महामंडळाकडे नोंदवावी. त्यानुसार, महामंडळाने औषधे, वैद्यकीय उपकरणांची खरेदी करावी, असा निर्णय मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.

मुंबई : राज्य शासनाच्या सर्वच विभागांनी त्यांना लागणारी औषधांची मागणी हाफनिक महामंडळाकडे नोंदवावी. त्यानुसार, महामंडळाने औषधे, वैद्यकीय उपकरणांची खरेदी करावी, असा निर्णय मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. या आधी फक्त सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण या दोन विभागांना हा निर्णय लागू होता.दरम्यान, नामांकित व दर्जेदार कंपन्या स्पर्धेत याव्यात यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या अटींना सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागांनीच सुरुंग लावला आहे. त्यामुळे हाफकिनमार्फत औषध खरेदी करण्याचा निर्णय अंमलात येण्यास अजूनही सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. आपल्या विभागाकडे जर खरेदीची जबाबदारी द्यायची असेल, तर ती कशी करायची हेदेखील आपला विभागच ठरवेल, अशी स्पष्ट भूमिका मंत्री गिरीश बापट यांनी घेतली आहे.हाफकिन महामंडळ हे अन्न व औषधी विभागाचे मंत्री बापट यांच्याकडे येते. त्यांच्या विभागाने औषध खरेदी करताना गुणवत्ता आणि संख्या यांचा समन्वय साधणाºया अटी निविदेत असाव्यात, केवळ दर कमी आहेत, म्हणून वाट्टेल ती कचरा औषधे घेणे योग्य नाही, अशी भूमिका घेतली. नव्या अटींमुळे चांगल्या दर्जेदार कंपन्या स्पर्धेत येतील. परिणामी, रुग्णांना चांगली औषधे मिळतील, असा आपला आग्रह आहे. मात्र, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागांनी या अटीलाच विरोध केल्याचे बापट यांनी सांगितले. जर संख्या हाच आधार धरला, तर कमी पैशांमध्ये औषधे मिळतात, म्हणून काहीही खरेदी केले जाईल. ते होऊ नये, यासाठी अन्य विभागाच्या मंत्र्यांशी आपण बोलणार आहोत. गरज पडली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय नेला जाईल, असेही बापट म्हणाले.सर्व विभागांनी त्यांच्या मागण्या हापकिनकडे नोंदवाव्यात. त्यानंतर, कोणती औषधे घ्यायची, याचा निर्णय अन्न व औषध प्रशासन विभागाने नेमलेल्या तांत्रिक समितीने घ्यावा, या समितीत सरकारशिवायचे बाहेरील तज्ज्ञदेखील असावेत, असा आग्रह आपण धरला आहे. कारण अमुक औषध का हवे, हे विचारणारे तज्ज्ञ जर या समितीत असतील, तर चांगली औषधे खरेदी होतील. मात्र, बाहेरील तज्ज्ञांंना घेण्यासाठीदेखील दोन्ही विभागांचा विरोध आहे. त्यामुळे ही फाइल अजूनही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :medicinesऔषधंMaharashtraमहाराष्ट्र