शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

‘सुगी’वर नोटबंदी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 06:20 IST

एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बंद झाल्याने, ऐन सुगी हंगामात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट

योगेश बिडवई / मुंबई एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बंद झाल्याने, ऐन सुगी हंगामात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळले आहे. शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने, ग्रामीण भागात अक्षरश: आर्थिक आणीबाणी उद्भवली आहे. खरिपाचे पीक बाजारात विक्रीसाठी आलेले असताना व रब्बी हंगामाची लगबग सुरू असताना, हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्याने, शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे. व्यापाऱ्यांनी कृषिमालाची खरेदी बंद केल्याने ग्रामीण चलनवलनच थांबले आहे. दमदार पावसामुळे राज्यात खरिपाचे जोमदार पीक आले आहे. शेतमाल विकून चार पैसे मिळण्याच्या आशेवर असलेले शेतकरी बहुतांश बाजार समित्या बंद असल्याने निराश आहेत. रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, मजुरीचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे रोकड शिल्लक नसल्याने स्थिती आणखी बिकट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव व लासलगाव बाजार समित्या वगळता, इतर ठिकाणी कांदाखरेदी सुरू होती. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांच्या हातात पुरेशी रोकड नसल्याने कांद्याला मोठी मागणी नाही. त्यामुळे व्यापारी कांद्याची खरेदी करत नसल्याचे चित्र आहे. सरकारी कार्यालयांप्रमाणे कृषिमाल विकल्यानंतर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, म्हणजे घाऊक व्यवहार सुरळीत होतील, असे मत पिंपळगाव बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप बनकर यांनी व्यक्त केले.विदर्भ व मराठवाड्यात मका, कापूस, सोयाबीनची विक्री करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. काहींना उधारीवर तर काहींना चेकने माल विकावा लागत आहे. ही एकप्रकारची आर्थिक आणिबाणीच असल्याचे कृषी अर्थतज्ज्ञ रमेश पाध्ये यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने नोव्हेंबर हा महत्त्वाचा महिना असतो. खरिपाचे पीक बाजारात विकून रब्बीची तयारी सुरू होते. त्यासाठी चार पैसे त्याच्या हातात असणे गरजेचे असते. मात्र सरकारने पुरेशी काळजी न घेता शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता सुगीच्या दिवसांतच नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळले आहे. देशात एका आठवड्यात कांद्याच्या मागणीत तब्बल ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे आम्ही जपून खरेदी करत आहोत, असे कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्षसोहनलाल भंडारी म्हणाले.