शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

कोणाचेही पूज्य पिताजी मुंबई तोडू शकणार नाहीत

By admin | Updated: December 16, 2014 01:10 IST

मुंबई काल महाराष्ट्रात होती, आज आहे आणि उद्याही राहील. कोणाचे पूज्य पिताश्री आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाहीत आणि आम्ही ते होऊ देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री : शिवसेनेला दिले चोख प्रत्युत्तर नागपूर : मुंबई काल महाराष्ट्रात होती, आज आहे आणि उद्याही राहील. कोणाचे पूज्य पिताश्री आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाहीत आणि आम्ही ते होऊ देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शिवसेनेचे नाव न घेता विधानसभेत प्रत्युत्तर दिले.मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यावरून शिवसेनेच्या मुखपत्रातून बरीच टीका झाली; शिवाय विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरत सरकारला धारेवर धरले होते. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडलेल्या भूमिकेवरून गहजब निर्माण केला जात आहे. छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ नेते त्याबाबत बोलत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. मुंबई महापालिका वा एमएमआरडीएच्या अधिकारांत हस्तक्षेप करण्याचा शासनाचा कुठलाही उद्देश नाही. पायाभूत सुविधांसह मुंबईचे अनेक प्रकल्प केंद्र सरकारकडे विविध प्रकारच्या मान्यतेसाठी जातात. त्यांना फास्ट ट्रॅक मान्यता मिळणे आवश्यक असते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घ्यावा. म्हणजे प्रकल्प मार्गी लागतील, अशी मुंबई आणि राज्य हिताची भूमिका मी मांडली. तिचे स्वागत करण्याऐवजी बाऊ केला जात आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार असे आरोप केवळ राजकारण करण्यासाठी केला जात आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प गतीने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. सीमाभाग मिळालाच पाहिजेकर्नाटकातील सीमाभाग महाराष्ट्राचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला लढण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील, असे ते म्हणाले. सीमाभाग हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी बांधवांच्या अस्तित्वाचा विषय असल्याचे ते म्हणाले.अभिभाषणाबद्दल राज्यपालांचे अभिनंदन करणारा ठराव मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मंजूर करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)शिवस्मारकाचे भूमिपूजन १९ फेब्रुवारीला करणारमुंबईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकारचे भूमिपूजन येत्या १९ फेब्रुवारीला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. आपल्या सरकारने या स्मारकासाठी अत्यंत आवश्यक असलेली केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी एक महिन्याच्या आत मिळविली. आधीच्या सरकारने या स्मारकाचा अतिशय चांगला आराखडा तयार केलेला आहे, अशी पुस्तीही फडणवीस यांनी जोडली. -डॉ.आंबेडकर स्मारक उभारण्याचा निर्धारमुंबईतील इंदू मिलच्या जागेवर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी केंद्र सरकारने या स्मारकाबाबत काही मुद्यांवर राज्य शासनाकडून हमीपत्र मागितले होते. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांना वेळ मिळाला नसेल, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. ते म्हणाले की, १७ नोव्हेंबरला आपल्या सरकारने हे हमीपत्र पाठविले आहे. दाभोळ वीज प्रकल्प बंद होणार नाहीदाभोळ वीज प्रकल्पात बँकांचे मोठ्या प्रमाणात पैसे गुंतलेले आहेत. हा प्रकल्प बंद होणे मोठ्या आर्थिक नुकसानीस कारण ठरेल. या प्रकल्पात केंद्र सरकारने मोठा वाटा उचलावा, राज्य सरकार काही नुकसान सहन करेल. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज सेंट्रल ग्रीडमध्ये जाईल. तेथून नियमानुसार राज्याला आपला हिस्सा मिळेल, अशा पद्धतीची बोलणी चालू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.कोस्टल रोड करणारचमुंबईत कोस्टल रोड करणे हा पृथ्वीराज चव्हाण यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण केंद्राच्या २०११ च्या अधिसूचनेत त्याचा समावेश त्यांना करून घेता आला नाही. आपले सरकार ते केल्याशिवाय राहणार नाही. नरिमन पॉर्इंट ते मालाडपर्यंतचा ३४ किलोमीटर लांबीच्या या रोडमधील अडथळे आम्ही दूर करू, असे फडणवीस यांनी सांगितले. सागरी मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करणे, पर्यावरणाचा अभ्यास अहवाल, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाची मंजुरी आणणे, निविदा प्रक्रिया आदी कामे सल्लागार मे. स्टुप अ‍ॅण्ड कन्झोर्टियम करीत आहे. समुद्रात भराव टाकून सागरी मार्गाच्या बांधकामास तत्त्वत: मंजुरी देण्याबाबत तत्कालीन सरकारने केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना विनंती केली आहे, असे ते म्हणाले. मुंबई मेट्रोची प्रगती- नवी-मुंबईमधील बेलापूर ते पेंधर या मेट्रो रेल्वे मार्गिकेचे बांधकाम सिडकोमार्फत प्रगतिपथावर- मुंबईमधील मेट्रो लाईन - ३ कुलाबा-वांद्रे- सीप्झच्या कामाला पुढील वर्षाच्या सुरुवातीस प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणे अपेक्षित.- मुंबई व ठाणे शहरातील वडाला-घाटकोपर-तीन हात नाका (ठाणे)-कासारवडवली या मेट्रो रेल्वे मार्गिकेला मंजुरी.- मुंबईमधील दहीसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या सुधारित मेट्रो लाईन - २ मेट्रो रेल्वे मार्गिकेचादेखील सविस्तर प्रकल्प- कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्पाची उभारणी मुंबई मेट्रो रेल महामंडळामार्फत या प्रकल्पाची उभारणी होईल. सल्लागारांची नेमणूक करणे, बांधकाम कंत्राटदारांची पूर्वअर्हता निविदा कामे सुरू झाली आहेत.