शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

"नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला राज्यात उभं केलं हे कुणीही विसरू शकणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 19:42 IST

loksabha election Result - लोकसभेत विजय मिळवणाऱ्या १४ खासदारांच्या सत्कार कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ज्येष्ठ नेत्यांनी कौतुक केले. 

मुंबई - ज्यारितीने महाराष्ट्रात नाना पटोलेंनीकाँग्रेस उभी केली ते महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. कठीण काळात काँग्रेस उभी करणे, नुकतीच उभी केली नाही तर आर्थिकदृष्ट्याही चांगल्याप्रकारे सावरलं. तुम्ही जे काम केले ते सदैव लक्षात राहणारं आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं कौतुक केले आहे.

काँग्रेसच्या नवनियुक्त खासदारांची मुंबईत टिळक भवनला बैठक पार पडली. या बैठकीत सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, गेल्या १५ वर्षानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये अभूतपूर्व इतिहास घडला आहे. नाना पटोलेंच्या कारकि‍र्दीत हा इतिहास घडतोय त्याचा आनंद आहे. एका खासदारावरून १४ खासदार निवडून आले आहेत. हे चित्र महाराष्ट्रात आम्हाला दिसलं नव्हते. नानाभाऊ रात्रदिवस काम करत होते. आज सकाळी एका जिल्ह्यात, दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात आणि संध्याकाळी तिसऱ्या जिल्ह्यात अशाप्रकारे महाराष्ट्र नाना पटोलेंनी पिंजून काढला असं त्यांनी सांगितले.

तसेच प्रदेशाध्यक्ष म्हणून जे जे काही करावे लागते ते त्यांनी प्रामाणिकपणाने आणि सढळ हाताने केले. मी दोनदा अध्यक्ष  राहिलो आहे, जे त्यांनी केले ते आम्हाला करता आलं नाही. पण आज त्याचे चांगल्या प्रकारे काँग्रेसला विजय मिळाला आहे. या विजयाने आम्ही भारावून गेलो आहोत. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. आमच्या सहकाऱ्यांना दिशा दाखवली. नानाभाऊ तुम्ही असेच कार्य करत राहा. तुम्हाला पक्षश्रेष्ठी पुढे घेऊन जातील असा विश्वास सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, विदर्भात खूप चांगल्या प्रकारे यश मिळाले. आमच्या विशाल पाटलांनी कमाल केली. अपक्ष लढले आणि जिंकून आल्यानंतर इथे आले. विशाल काँग्रेससोडून कधी जाऊ शकणार नाही. त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी महाराष्ट्रात काँग्रेसला योगदान दिले. जनतेच्या कल्याणासाठी छत्रपती शाहू काम करतात. सामाजिक विचारांचा इतिहास ज्यांनी रचला त्यांचे वंशज शाहू छत्रपती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेत. नव्या राजकीय वाटचालीत शाहू छत्रपतींचा जयजयकार जनतेने केले. याला कारणीभूत नाना पटोले आहेत. ज्यारितीने त्यांनी काँग्रेसची मान उंचावण्याचा प्रयत्न केला. अभूतपूर्व यश मिळवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो असंही सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल