शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

युतीच्या जागावाटपाबाबत सेनेला कोणताही शब्द दिलेला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 06:49 IST

जागा वाटपाबाबत अमित शहांची राज्यातील नेत्यांना सूचना

हरिश गुप्ता

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी नेमक्या किती किती जागा लढवायच्या आहेत, याचा कोणताही शब्द शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला गेलेला नाही. शिवसेनेबरोबरचे जागा वाटपाशी संबंधित मुद्दे निकाली काढा, असे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातील भाजपला सांगितले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेना व इतर पक्षांबरोबर जागा वाटपाची बोलणी किंवा वाटाघाटी तुम्ही करायची आहे, हे स्पष्टपणे कळवले आहे.

अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांची मुंबईत ‘मातोश्री’वर भेट घेतली होती व या भेटीत विधानसभा निवडणुकीबाबत कोणताही शब्द दिला नव्हता. तेव्हा झालेली बोलणी ही फक्त लोकसभेच्या किती जागा लढवायच्या एवढ्यापुरतीच मर्यादित होती. शिवसेनेने लोकसभेसाठी २३ जागा मागितल्या होत्या व त्या मान्यही झाल्या होत्या. ठाकरे यांना त्याचवेळी विधानसभा निवडणुकीसाठीही जागांची चर्चा करायची होती. परंतु, तशी काही चर्चा झाली नाही, असे भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणतेही मतभेद होऊ नयेत, असे भाजपला हवे होते. त्यामुळे शिवसेनेच्या सगळ््या मागण्या मान्य केल्या गेल्या. परंतु, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष श्रेष्ठींनी जागा वाटपाचा प्रश्न कसा सोडवायचा हे महाराष्ट्र भाजपकडे सोपवले असून स्वत: ठराविक अंतरावर राहायचे ठरवले आहे. भाजप श्रेष्ठींना जागा वाटपाच्या कामात गुंतायचे नाही म्हणून त्यांनी हा उपाय केला असून करार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अनुभवावर सोपवली आहे. भाजप-सेनेबरोबर देवाण-घेवाण करण्यास उत्सुक आहे. परंतु, जागा वाटप ५० : ५० असे नसेल. ते असेल ते गुणवत्ता आणि जिंकण्याची क्षमता या आधारावर, असे सूत्रांनी सांगितले व आता हे काम राज्य भाजपला करायचे आहे, असे त्यांनी म्हटले.

कठोर भूमिकेचे भाजपकडून संकेतपक्षश्रेष्ठींचा पवित्रा मित्रपक्षांच्या दबाबाला बळी न पडता ठाम भूमिका घेतली जाईल, असे संकेत देणारा आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत युतीतील मित्रपक्ष मागण्या करणार असेल तर स्वबळावर निवडणूक लढवण्यास भाजप तयार आहे. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना जागावाटपावर एकमत न झाल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस