शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

निवडणुकीतून माघार पण राजकारणातून निवृत्ती नाही : गणपतराव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:04 IST

विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी केले स्पष्ट

ठळक मुद्दे१९६२ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपण सक्रिय आहोत - गणपतराव देशमुखमाझ्या कार्यकाळात अनेक आमिषे, प्रलोभने आली. परंतु मी त्याला कधीही बळी पडलो नाही - गणपतराव देशमुखस्वत:ची तत्त्वे कधीच सोडली नाहीत. १९६२ पासून सध्या शेकापला मतदान करणारी ही तिसरी पिढी आहे - गणपतराव देशमुख

सांगोला : निसर्ग नियमांचा संकेत मान्य करून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतून आपण माघार घेतली आहे़ तरीही दुष्काळी सांगोला तालुका विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत राजकारण व समाजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याचे आ़ गणपतराव देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. 

लोकसभा निवडणुकीत देशात भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. परंतु त्यांनी या निवडणुकीत ७० वर्षांहून अधिक वय झाल्याने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व सुमित्रा महाजन यांना विश्रांती दिली. वाढत्या वयामुळे डोळ्यांना पूर्वीसारखे स्पष्ट दिसत नाही. कानालाही कमी ऐकू येते. देशाच्या व राज्याच्या निवडणुकीत ९३ वर्षांचा उमेदवार आजपर्यंत पाहिला आहे का ? 

२०१४ च्या निवडणुकीतच आपण हा निर्णय घेणार होतो. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीला सामोरे गेलो. चालू वर्षीही कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यास कार्यकर्त्यांची समजूत काढून सर्वानुमते शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निश्चित करू आणि सर्वांनी मनापासून त्याचे काम करून सांगोल्यातून पुन्हा एकदा शेकापचाच उमेदवार निवडून आणू़ शेकापचा बालेकिल्ला अभेद्य राखू, असेही त्यांनी सांगितले. 

वाढत्या वयामुळे दुष्काळी सांगोला तालुक्याचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडता येणार नाहीत. आपल्या कार्यकाळात शिरभावी प्रादेशिक नळपाणीपुरवठा टेंभू-म्हैसाळ योजना यासह अनेक योजना मार्गी लावल्या. अंतिम टप्प्यात असलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी शेकापची धुरा नवीन उमेदवाराकडे देऊन आपण मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणार असल्याचेही ते म्हणाले. 

तत्त्वनिष्ठा हेच यशाचे गमक१९६२ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपण सक्रिय आहोत. माझ्या कार्यकाळात अनेक आमिषे, प्रलोभने आली. परंतु मी त्याला कधीही बळी पडलो नाही. स्वत:ची तत्त्वे कधीच सोडली नाहीत. १९६२ पासून सध्या शेकापला मतदान करणारी ही तिसरी पिढी आहे. शेकाप कार्यकर्त्यांचा संचच आपले भांडवल आहे व तत्त्वनिष्ठा हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे आ़ गणपतराव देशमुख यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुखvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण