शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार नाही, गडकरींचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 11:02 IST

आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई - आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या पेटलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांनांही आरक्षण मिळाले पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले होते. मात्र त्यावरून चर्चेस सुरुवात झाल्यानंतर गडकरी यांनी ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे. 

औरंगाबाद येथे बोलताना गडकरी यांनी "गरीब असलेल्या कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीचा आरक्षणासाठी विचार व्हायला हवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, जात, पंथ, धर्म आणि भाषा यावरील राजकारण थांबविण्याची आवश्यकता आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणावर विचार करण्याची गरज आहे. गरीब हा गरीब असतो. त्याला जात , पंथ, धर्म नसतो." असे मत मांडले होते. तसेच देशात सामाजिक आणि शैक्षणिक निकषावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गांसाठी आरक्षण लागू करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्यांची मर्यादी ठरवून दिलेली आहे. याची मर्यादा वाढवायची असेल आणि मराठा आरक्षण द्यायचे असेल तर घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. यात विरोधकांनी सहकार्य केले तरच घटनादुरुस्ती होऊ शकते, असेही ते म्हणाले होते.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीreservationआरक्षणGovernmentसरकार