शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात परिचारिकांअभावी आरोग्यसेवेचा कणा खिळखिळा; 3 हजार 410 पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 07:00 IST

शहरात एका रूग्णामागे तीन तर ग्रामीण भागात एका रूग्णामागे चार परिचारिका असणे बंधनकारक आहे. ..

ठळक मुद्देसद्यस्थितीत शहरात एका परिचारिकेला 50 ते 60 रूग्णांची अथवा संपूर्ण वॉर्ड सांभाळावा लागतोय शासकीय रूग्णालयांमधील रूग्णांची वाढती संख्या पाहाता परिचारिका दुप्पट असणे आवश्यक वैद्यकीय शिक्षण आणि द्रव्ये विभागात 12 हजार 44 मंजूर पदांपैकी 2 हजार 125 पदे रिक्त

पुणे : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सरकारी रूग्णालयांमध्ये परिचारिकांच्या 25 हजार 274 मंजूर पदांपैकी 3 हजार 410 पदे रिक्त आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवेचा कणा मानल्या जाणा-या परिचारिकांवर या रिक्त पदांमुळे अतिरिक्त ताण येत आहे. पदे भरायचीच नाहीत किंवा भरली तरी ती अकरा महिने करारावर भरायची या शासनाच्या धोरणामुळे आरोग्यसेवेचा कणाच खिळखिळा झाला आहे.     इंडियन नर्सिंग कौन्सिलने(आयएनसी) शहर आणि ग्रामीण रूग्णालयांमध्ये किती परिचारिका असल्या पाहिजेत यासंदर्भातील प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार शहरात एका रूग्णामागे तीन तर ग्रामीण भागात एका रूग्णामागे चार परिचारिका असणे बंधनकारक आहे. मात्र या प्रमाणतेकडे दुर्लक्ष करीत सद्यस्थितीत शहरात एका परिचारिकेला 50 ते 60 रूग्णांची अथवा संपूर्ण वॉर्ड सांभाळावा लागत आहे. आयएनसीच्या प्रमाणाची अमंलबजावणी अद्यापही होऊ शकलेली नाही. सार्वजनिक आरोग्य सेवा विभागात अधिसेविका वर्ग 3, सहाय्यक अधिसेविका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका/निर्देशिका, शुश्रृषा अधिकारी/ क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, मनोरूग्ण तज्ञ परिचारिका, बालरूग्ण तज्ञ परिचारिका, परिसेविका, अधिपरिचारिका, एल.एच.व्ही आणि ए.एन.एम अशी अनेक पदे रिक्त आहेत. शासकीय रूग्णालयांमधील रूग्णांची वाढती संख्या पाहाता परिचारिका दुप्पट असणे आवश्यक आहे. मात्र नवीन परिचारिकांची भरती होत नाही आणि रिक्त पदेही भरली जात नसल्याने परिचारिकांवर अतिरिक्त ताण येत आहे. परिचारिकांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. यातच आता सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदे भरली जात आहेत. मात्र रुग्णसेवा सुरळीतपणे चालू राहण्याकरीता परिस्थितीनुसार तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करण्यात येतात, अशी माहिती महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन टिळेकर यांनी  लोकमत शी बोलताना दिली. सर्वात बिकट स्थिती ग्रामीण भागात आहे. सर्वच रूग्णांकडे परिचारिकांना लक्ष देणे शक्य होत नाही. गंभीर रूग्णांकडेच त्यांना लक्ष द्यावे लागते.  रिक्त पदांमुळे सामान्य रुग्णांना फटका सहन करावा लागतो. ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे.  अशा स्थितीत अनेक रुग्णालयांमध्ये परिचारिकांना रुग्णसेवेसाठी अधिक वेळ द्यावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले............. वैद्यकीय शिक्षण विभाग प्राचार्य-प्राध्यापकांविनाराज्यातील मुंबई, औरंगावाद, यवतमाळ, चंद्रपूर अशा ज्या भागांमध्ये शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण आणि द्रव्ये विभागात 12 हजार 44 मंजूर पदांपैकी 2 हजार 125 पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये अधिक्षिका शुश्रृषा सेवा, प्राध्यापक प्राचार्य, प्राचार्य, प्राध्यापक, सह्योगी प्राध्यापक, व्याख्याता, सेविका वर्ग 2 श्रेणी 1, सेविका वर्ग 2 श्रेणी 2, सहाय्यक अधिसेविका, निर्देशिका, विभागीय परिसेविका, सेविका, आरोग्य परिसेविका, परिसेविका, रूग्ण परिसेविका आणि परिचारिका या पदांचा समावेश आहे.

.........अत्यावश्यक पदे रिक्तमनोरुग्ण तज्ज्ञ आणि बालरुग्ण परिचारिकांचे प्रमाण सर्वात कमी आहे. बालरुग्णांसाठीच्या १३४ पैकी ९० जागा तर मनोरुग्णांसाठीच्या १४७ पैकी थेट ८२ जागा रिक्त आहेत. शुश्रृषा अधिकाºयांची १६९ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात १२१ पदे भरलेली नाहीत. अश्ीच बिकट अवस्था सहाय्यक अधिसेविकांची आहे. मंजूर १३९ पदांपैकी ९२ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या ११ पैकी ७ पदे रिक्त आहेत. 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर