पिंपरी : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदीची प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने झाली आहे. निविदा २५ लाखांची असताना २४ लाखांचा गैरव्यवहार कसा, असा प्रश्न स्थायी समितीमध्ये उपस्थित केला. ठेकेदाराने दिशाभूल केल्याने महापालिकेची बदनामी झाली आहे, अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.पालिकेच्या वतीने संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात येते. यंदाच्या मूर्ती खरेदीत २४ लाखांचा घोटाळा झाला होता, असा आरोप करण्यात आला होता. त्याचे पडसाद स्थायी समिती सभेत उमटले. या वेळी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव करण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदीची निविदा सादर करताना आल्हाट आर्ट स्टुडिओने ४१०० रुपये प्रतिमूर्ती दर भरला होता. हा दर निविदेतील दुसऱ्या क्रमांकाचा दर होता. त्यांनी सदरच्या मूर्तीचे २७५० रुपये हे दर इतर खरेदीदारांना दिले असून, माध्यमांना दिले. त्यामुळे खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे. अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असा ठराव मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)>आॅनलाइन निविदा : बदनामी करण्याचा प्रयत्नसुमारे ६५० दिंडीकऱ्यांना मूर्ती भेट देण्यासाठी सुमारे २५ लाखांची निविदा काढण्यात आली होती. आॅनलाइन पद्धतीने तीन निविदा भरण्यात आल्या. त्यापैकी कमी दराची निविदा मंजूर केली होती. पंचवीस लाखांची निविदा असताना चोवीस लाखांचा गैरव्यवहार कसा झाला, असा प्रश्न सदस्यांनी सभेत उपस्थित केला. भावनिक मुद्दा बनवून महापालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याचा निषेधही करण्यात आला. सदस्यांनी प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेची माहिती घेतली. त्या वेळी साडेआठशे मूर्तीच्या खरेदीची उपसूचना मंजूर केलीच नाही, मग गैरव्यवहार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
मूर्ती खरेदीत नाही गैरव्यवहार
By admin | Updated: July 20, 2016 01:50 IST