शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

मुख्यमंत्र्यांवर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नको!

By admin | Updated: December 2, 2014 00:38 IST

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले काम करायची क्षमता आहे. जर त्यांच्यावर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नसला तर ते राज्याला देशाचा ‘हेडमास्टर’ बनवतील या शब्दांत

अण्णा हजारे : नरेंद्र मोदी यांनी जनतेची दिशाभूल केल्याची टीकानागपूर : राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले काम करायची क्षमता आहे. जर त्यांच्यावर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नसला तर ते राज्याला देशाचा ‘हेडमास्टर’ बनवतील या शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अप्रत्यक्षपणे सरकारवर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावावर टीका केली. नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अण्णा हजारे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील हल्लाबोल केला. मोदी हे बोलतात खूप, परंतु कृतीमधून ते प्रत्यक्षात उतरत नाही. परदेशातील बँकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा १०० दिवसांत परत आणणे शक्य नाही हे मोदींना माहीत होते. परंतु तरीदेखील त्यांनी मतांसाठी खोटे आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली असे हजारे म्हणाले. मोदी यांनी आपण पाठविलेल्या पत्राची योग्य ती दखल घेण्यात आली नसल्याची खंतदेखील त्यांनी बोलून दाखविली.सरकारची खुर्ची संकटात आली तरच आंदोलनाची दखल घेतली जाते. त्यामुळे जर एखादा बदल घडवून आणायचा असेल तर जनतेने मोठ्या प्रमाणात संघटित व्हायला हवे असे ते म्हणाले. जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडाची त्यांनी निंदा केली. असे प्रकार थांबविण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा वाढवला पाहिजे असे ते म्हणाले. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे व धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ.बबन तायवाडे उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी हजारे यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्यांनी स्वत:चा संघर्ष व नेमकी स्फूर्ती कुठून मिळते याबाबत माहिती दिली. तसेच तरुणांनी समाजासाठी चांगली कामे करून देशविकासाला हातभार लावावा असे आवाहन केले. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांसाठी देशपातळीवर लढा उभारण्याचा विचारस्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची अवस्था ‘माल खाये मदारी ; नाच करे बंदर’ अशी झाल्याची टीका त्यांनी केली. ‘राईट टू रिजेक्ट’ आणि ‘राईट टू रिकॉल’ या दोन गोष्टींनंतर देशपातळीवर शेतकऱ्यांचा लढा उभारणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या आंदोलनाचीदेखील त्यांनी प्रशंसा केली.निवडणुका घटनाबाह्यदरम्यान, यावेळी अण्णा हजारे यांनी देशात घेतल्या जाणाऱ्या निवडणुका घटनाबाह्य असल्याचा आरोप लावला. घटनेमध्ये निवडणुकांमध्ये पक्षाचा कुठेही उल्लेख नाही. केवळ व्यक्ती निवडणुका लढू शकतात, असे नमूद आहे. मग पक्ष कसे काय निवडणुकांत उतरतात? समूहांमुळेच भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगही कारवाई करण्यास धजावत नाही, असा आरोप हजारे यांनी लावला. विद्यार्थ्यांनी अण्णांना अभ्यासू प्रश्न विचारून ‘गुगली’ टाकली.केजरीवाल परत आले तर स्वागतचअरविंद केजरीवाल यांच्या डळमळीत कारभारामुळे आंदोलनाचे नुकसान झाले का, असे विचारले असता त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जर केजरीवाल आंदोलनात परत जुळले तर त्यांचे स्वागत करील. पण मी कुठल्याही पक्षासोबत जाणार नाही. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर त्यांनी मौन साधले.