शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

खंडणीखोर पोलिसांवर गुन्हे दाखल नाहीतच

By admin | Updated: May 1, 2017 02:41 IST

जुगारअड्ड्यावरची रोकड परस्पर लंपास केलेल्या दिघी पोलिसांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर नोटाबदलीच्या

पिंपरी : जुगारअड्ड्यावरची रोकड परस्पर लंपास केलेल्या दिघी पोलिसांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर नोटाबदलीच्या प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्याच्या एका उपनिरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांना खात्यामधून बडतर्फ करण्यात आले. लष्कर पोलीस ठाण्याच्या एका उपनिरीक्षकालाही हॉटेलचालकाकडे हप्ता मागितल्याप्रकरणी निलंबनाला सामोरे जावे लागले. मात्र, या बेशिस्त आणि खंडणीखोर पोलिसांवर गुन्हे का दाखल करण्यात येत नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. निलंबन अथवा बडतर्फीची  कारवाई दोषी आढळल्यानंतरच केली जाते. जर हे सर्व जण दोषी असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. कोथरूड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विक्रम प्रतापसिंग राजपूत, पोलीस हवालदार हेमंत मधुकर हेंद्रे, पोलिस नाईक अजिनाथ साहेबराव शिरसाट, कर्मचारी अश्वजित बाळासाहेब सोनवणे आणि संदीप झुंबर रिटे यांनी एका व्यापाऱ्याकडून चलनामधून बाद झालेल्या ५०० आणि हजार रुपयांच्या ६६ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात रेकॉर्डवर २० लाख रुपयेच जप्त केल्याचे दाखविले होते. तशीच नोंद स्टेशन डायरीत करण्यात आली होती. हे प्रकरण तीन आठवडे दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्याला शेवटी वाचा फुटलीच. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी याची गंभीर दखल घेऊन  चौकशीचे आदेश दिले.  चौकशीत व्यापारी आणि पोलिसांचे जाबजबाब नोंदविण्यात आले. दोषी आढळून आल्यावर पोलिसांवर थेट बडतर्फीची कारवाई  करण्यात आली. (प्रतिनिधी)रक्कम हडपली : स्टेशन डायरीमध्ये नाही नोंददिघी पोलिसांनी एका जुगारअड्ड्यावर छापा टाक ला होता. छापा टाकून जप्त केलेली रक्कम या पोलिसांनी हडप केली. वास्तविक, ही रक्कम जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करून तशी नोंद स्टेशन डायरीमध्ये करणे अपेक्षित होते. हा प्रकार आॅक्टोबर २०१६मध्ये डुडुळगावात घडला होता. सहायक पोलीस निरीक्षक संतोष काटे, पोलीस नाईक सोमनाथ बाबासाहेब बोऱ्हाडे, नामदेव खेमा वडेकर, विपुल लंकेश्वर होले, शिवराज भगवंत कलांडीकर व पोलीस शिपाई परमेश्वर तुकाराम सोनके यांना याप्रकरणी चौकशीत दोषी आढळून आल्याने निलंबित करण्यात आले होते. तर, काही दिवसांपूर्वी लष्कर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गुजर यांनी हप्त्यासाठी एका हॉटेल व्यावसायिकाला केलेली शिवीगाळ वायरल झाली होती. त्यामध्ये अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबाबतही आक्षेपार्ह विधान या उपनिरीक्षकाने केल्याचे समोर आले होते. त्याच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. केवळ तोंडदेखली कारवाई1 - निलंबन कालावधीमध्ये खात्यांतर्गत आणि विभागीय चौकशी केली जाते. ही चौकशी संपल्यानंतर संबंधितांना खात्यात ठेवले जाते अथवा काढून टाकले जाते. दोषाच्या गंभीर्याप्रमाणे कधीकधी शिक्षा देऊन पुन्हा रुजू करूनही घेतले जाते. जेव्हा निलंबन अथवा बडतर्फीची कारवाई केली जाते, तेव्हा चौकशी झालेली असते. दोषी आढळून आल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई केली जाते. जर हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दोषी असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल का केले जात नाहीत, असा प्रश्न आता चर्चेला येऊ लागला आहे.2 - केवळ तोंडदेखली कारवाई करून प्रकरण थंड केले जाते. मात्र, पुढे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून केला जाऊ लागला आहे. दोषी पोलिसांवर या संदर्भात खंडणीसारख्या गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. या मागणीचा विचार वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार का, हा प्रश्न आहे.