शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सरकारी कामात विलंब झाल्यास पदोन्नती नाही; शिक्षण विभागाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 07:29 IST

न्यायालयात याचिका दाखल झाल्याने शिक्षण विभागाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बदलीची प्रकरणे, शाळांचे विविध प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा वेळच्या वेळी निपटारा होत नसल्याने संबंधित शाळा तसेच कर्मचाऱ्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. न्यायालयाकडूनही या संदर्भात शालेय शिक्षण विभागाला सक्त ताकीद देण्यात आली आहे. यामुळे जाग आलेल्या सरकारकडून बदली तसेच अन्य प्रकरणांचा वेळेत निपटारा करा, नाही तर शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, वेळ पडल्यास पदोन्नतीही रोखली जाईल, असे आदेशच जारी करण्यात आले आहेत.

बैतुल उलूम एज्युकेशन सोसायटी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र, त्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने संस्थेने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. उच्च न्यायालयाने यावर ४५ दिवसांत कार्यवाही करण्याचे आदेश दिलेच, शिवाय अशाप्रकारे दिरंगाई होत असेल तर २००५ च्या कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेश दिले. याचप्रमाणे शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर बदलीसह विविध प्रकरणे प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने थेट  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिवांनाच या संदर्भात परिपत्रक जारी करण्याचे निर्देश दिले.

न्यायालय काय म्हणाले?सादर झालेले प्रस्ताव व निवेदनांमध्ये कोणतीही कायदेशीर अडचण नसल्यास ते विहीत कालमर्यादेत निकाली काढण्यात यावेत. तसे न झाल्यास या कृतीबाबत संबंधित अधिकाऱ्याच्या सेवापुस्तकात नोंद घेण्याबाबत तसेच त्या अधिकाऱ्याच्या पदोन्नतीवेळी उक्त बाब विचारात घेण्याबाबत निर्देश देण्यात येतील.

शालेय शिक्षण विभागाने पत्रकात म्हटले आहे...उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तत्काळ काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, यानुसार सरकारी कामात जर अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कुचराई केली जात असेल तर त्याची नोंद त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये करण्यात यावी. त्याचप्रमाणे पदोन्नतीवेळी ही बाब लक्षात घेऊन वेळ पडल्यास पदोन्नतीही रोखली जावी तसेच २००५ च्या कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणjobनोकरी