शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

यापुढे १५ दिवसांत जलजोडणी!

By admin | Updated: February 4, 2016 04:16 IST

सर्व झोपड्या/वस्त्यांना त्यांच्या अस्तिवात येण्याचा काळ विचारात न घेता जलजोडण्या देण्याबाबतचे धोरण महापालिका तयार करत आहे

मुंबई: सर्व झोपड्या/वस्त्यांना त्यांच्या अस्तिवात येण्याचा काळ विचारात न घेता जलजोडण्या देण्याबाबतचे धोरण महापालिका तयार करत आहे. या संदर्भात अलीकडेच उच्च न्यायालयाने पालिकेला निर्देश दिले होते. हे धोरण मान्य झाल्यास अधिकाधिक अनधिकृत जोडणीधारक अधिकृत जलजोडण्यांच्या कक्षेत येतील. ‘इझ आॅफ डुइंग बिझनेस’ संकल्पने अंतर्गत जलजोडणी प्रक्रिया आता आॅनलाईन करण्यात आली आहे. परिणामी या प्रक्रियेनुसार ग्राहकांना पंधरा दिवसांत जलजोडणी मिळणार आहे.भविष्यात १२४ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. मरोशी-रुपारेल जलबोगद्यासाठी ५० लाख, गुंदवली ते कापूरबावडी आणि कापूरबावडी ते भांडुप या जलबोगद्यासाठी ९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पवई ते वेरवली आणि पवई ते घाटकोपर या जलबोगद्यासाठी ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. चेंबूर ते परेल जलबोगद्यासाठी ८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. चेंबूर ते ट्रॉम्बे जलबोगद्यासाठी ५३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जुन्या बोगद्यांची तपासणी आणि स्थिती सर्वेक्षणासाठी ४.७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलाशयांच्या दुरुस्तीसह पुनर्बांधणीसाठी ११.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलप्रक्रिया केंद्राच्या पुनर्बांधणीसाठी २१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यातील सुधारणेसह नव्या जलवाहिन्या टाकण्यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलजोडण्यांचा जुडगा काढण्यासाठी १८.९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. झडप कक्षाच्या दुरुस्तीसाठी ९.१० कोटी, जलवितरण वाहिन्यांच्या अंतर्गत सिमेंट मुलाम्यासाठी ६.६५ कोटी, जलवितरण वाहिन्यांच्या पुनर्वसनासाठी १८०.७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.गारगाई प्रकल्पासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथून प्रतिदिन ४४० दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होईल. पिंजाळ प्रकल्पासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प २०१६-१७ मध्ये पुर्ण होईल. या प्रकल्पातून प्रतिदिन ८६५ दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होईल. दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पातून प्रतिदिन १ हजार ५८६ दशलक्ष लीटर्स पाणी उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)मुंबई: अर्थसंकल्पात दरवर्षी भरीव तरतूद होत असली तरी यापैकी जेमतेम २५ ते ३० टक्के विकासावर खर्च होत आहे़ याची गंभीर दखल घेऊन आयुक्त अजय मेहता यांनी आपल्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे़ यापुढे खातेप्रमुखांना प्रकल्प मार्गी लावण्यासाठी डेडलाईनच देण्यात येणार आहे. त्यांचे प्रगती पुस्तक आयुक्त दर महिन्याला तपासणार असून कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीदच त्यांनी अर्थसंकल्पातून अधिकाऱ्यांना दिली आहे़आयुक्त अजय मेहता यांनी पालिकेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली़ अर्थसंकल्पातील तरतुदींचा वेळेवर वापर व्हावा, कामे वेळेत व पारदर्शीपणे व्हावीत यासाठी अतिरिक्त आयुक्तांनाही नियमित सर्व तरतुदींचा आढावा घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत़ तसेच वाढीव खर्च रोखण्यासाठी कामाचा अंदाज तयार करीत असताना कामाचे स्वरुप, जागेची स्थितीचा विचार करुन कामाच्या तांत्रिक बाबी तपासून तपशील तयार करावा, जेणेकरुन कंत्राटामध्ये फेरफार करावी लागणार नाही, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे़ तसेच या कामात कसूर राहिल्यास अधिकाऱ्यांनाच त्यासाठी जबाबदार धरण्यात येणार असल्याचा सज्जड दमही त्यांनी भरला आहे़ (प्रतिनिधी)