शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

ना मोबाइल, ना कनेक्टिव्हिटी, ऑनलाइन शिक्षणाची सरकारी यंत्रणा कुचकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 08:42 IST

आपल्या देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा विषय फारसा महत्त्वाने घेतलेला नाही. देशातील ऑनलाइन शिक्षणाची अवस्था सध्या परभारी (कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे) आहे. केंद्र, राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर सोपवून हात झटकले आहेत.

- संतोष मिठारीलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गामुळे देशात सलग दुसऱ्यावर्षी प्राथमिक ते उच्चशिक्षणासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर सुरू झाला आहे. मात्र, ते परिणामकारक व योग्य पद्धतीने होत नसल्याचे एकूणच चित्र आहे. शिक्षणाचे नवे भविष्य असलेल्या ऑनलाइन शिक्षणाची सध्याची अवस्था, आव्हाने आणि सरकारकडून कोणती पावले टाकली पाहिजेत, याबाबत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.

ऑनलाइन शिक्षणाची देशातील सध्याची अवस्था कशी आहे?आपल्या देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा विषय फारसा महत्त्वाने घेतलेला नाही. देशातील ऑनलाइन शिक्षणाची अवस्था सध्या परभारी (कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे) आहे. केंद्र, राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर सोपवून हात झटकले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मोबाइल, डाटा यांचा खर्च शिक्षक, पालक हे पदरमोड करून करत आहेत. या शिक्षणासाठी सरकारने कोणत्याही स्वरूपातील गुंतवणूक केलेली नाही. मोबाइल, शाश्वत स्वरूपातील इंटरनेटची कनेक्टिव्हिटी देण्याचे काम सरकारला करता आलेले नाही. देशात १४ दशलक्ष शाळा आणि ३० कोटी विद्यार्थी आहेत. त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाहीत. त्यांना कनेक्टिव्हिटी, डाटा उपलब्धतेची असलेली अडचण लक्षात न घेता निव्वळ परिपत्रकाचे फतवे काढून ऑनलाइन शिक्षण राबविण्याचे काम सरकारी यंत्रणेकडून झाले आहे. अगदीच काही नाही म्हणून सरकारने शिक्षणासाठीचे काही ॲप सुरू केले. मात्र, त्यात लिपी, भाषेच्या मर्यादा आहेत. हे ॲप सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे त्यांचा प्रचार, प्रसार केला नाही. एकूणच पाहता, ऑनलाइन शिक्षणाची अवस्था निव्वळ दिखाऊ, कामचलाऊ अशीच आहे.या शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत काय सांगाल?देशात गेल्यावर्षी एप्रिलपासून सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणाचे प्रमाणीकरण झालेले नाही. या शिक्षणात सार्वत्रिकता गरजेची होती. मात्र, व्यक्ती आणि शिक्षकनिहाय शिक्षणाची पद्धत राबविली जात आहे. काही शिक्षक हे तन्मयतेने, तर काही एक औपचारिकता म्हणून ऑनलाइन शिक्षण देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या स्वरूपातील शिक्षण हे फारसे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार नाही. याबाबत यंदा, तरी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.ऑनलाइन शिक्षणाबाबत सरकारने काय केले आहे?देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात शिक्षणासाठी मूलभूत स्वरूपात काम झालेले नाही. दूरदर्शनवर टिलीमिली, दीक्षा ॲप, ई-पाठशाळा, शैक्षणिक साधनांचा मुक्तस्रोत, स्वयं पोर्टल हे विद्यार्थ्यांसाठी, तर शिक्षकांना ई-कंटेट देणारे स्वयंप्रभा चॅनेल, निष्ठा ॲप, विरासत ॲप, प्रग्यता, पीएमई-विद्या यांची सुरुवात केली. मात्र, ते करताना विद्यार्थी, शिक्षकांच्या गरजा लक्षात घेतल्या नाहीत. भाषा बदलणे, सर्व्हर डाऊन आदी समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणाच्या या सुविधा अधिकतर उपयुक्त ठरत नसल्याचे वास्तव आहे. इंटरनेटवर विसंबून न राहता जगातील अन्य देशांनी समांतर व्यवस्था निर्माण केली. दूरदर्शन, रेडिओ, वृत्तवाहिनी या यंत्रणा एकमेकांशी जोडल्या. आपल्या देशात मात्र, यादृष्टीने काहीच झालेले नाही. अशा अधांतर स्वरूपातील ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे वाटोळे होत आहे.

महाराष्ट्रातील शिक्षण विभागाची कोरोनाकाळातील कामगिरी पाहता, या विभागाकडून निव्वळ परिपत्रके काढण्याचे काम झाल्याचे दिसते. ऑनलाइन शिक्षणाबाबतच्या अडचणी जाणून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे परिणामकारक काम झालेले नाही.     डॉ. सुनीलकुमार लवटे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ 

निव्वळ परिपत्रके काढण्याचे कामऑनलाइन शिक्षणात मुलांची एकाग्रता २०-२५ मिनिटे राहत असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे, तरीही आठ तास ऑनलाइन शिक्षण देण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे. 

टॅग्स :Schoolशाळा