शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही

By appasaheb.patil | Updated: November 20, 2019 14:49 IST

सुभाष देशमुख; राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं

ठळक मुद्दे- माजी सहकारमंत्री आ़ सुभाष देशमुख यांचा सोलापुरात वार्तालाप- कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली टीका- सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेला सर्व दरवाजे खुले 

सोलापूर : भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष हिंदुत्ववादी आहेत आणि हिदुत्वाच्या आधारावरच या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन करण्याचा डाव आखत आहेत़ मात्र राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही असा विश्वास माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़ पुढे बोलताना सुभाष देशमुख म्हणाले की, राज्यात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती करून विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत़ यात भाजपाचे १०५ तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत़ ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री असावा हा अलिखित नियम आहे. त्यामुळे भाजपने सत्ता स्थापन करताना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असा आग्रह धरला आहे. मात्र शिवसेनेने अवाढव्य मागण्या केल्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यास विलंब झाला.

 महायुतीने सत्तास्थापन न करून राज्यातील जनतेची घोर निराशा केली आहे़ आता शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करीत आहे़ मात्र भाजपला सोडून कोणतेही सरकार राज्यात सर्वाधिक काळ टिकणार नाही़ एवढेच नव्हे तर ते सरकार सुरक्षित राहील की नाही हेही सांगणे अवघड असल्याचं मत माजी सहकारमंत्री आ़ सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

दरम्यान, भाजप - शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत़ एकत्र येऊन बसल्याशिवाय युतीचं सत्तास्थापन अशक्य आहे़ राजकारणात कधीही काहीही होवू शकतं असंही देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा