शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

निधीचे मानापमान नको

By admin | Updated: November 5, 2016 03:34 IST

डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ५० लाखांच्या निधीला २७ गावांच्या राजकारणाचा फटका

मुरलीधर भवार,

डोंबिवली- डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ५० लाखांच्या निधीला २७ गावांच्या राजकारणाचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागल्याने हा निधी मानापमानात अडकवू नका, अशी भूमिका विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे. आयोजक आगरी युथ फोरमला हा निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी लवकरच पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही हे संमेलन शहराचे असावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यात सर्वांचा यथोचित सन्मान व्हावा, असे मत मांडत संमेलनाला सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी तर दोन पावले पुढे जात या संमेलनाला पालिकेने दोन कोटी रूपये द्यावेत, अशी भूमिका घेतली. या विषयावर प्रतिक्रियेसाठी स्वागताध्यक्ष आणि आयोजक आगरी युथ फोरमच्या प्रतिनिधींशी संपर्काचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. २७ गावांतील संघर्ष समितीच्या नेत्यांनीही गावांचे राजकारण आणि संमेलनाच्या निधीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.>अद्याप ठरावच नाही!संमेलनासाठी महापालिकेने ५० लाखांची तरतूद केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात या तरतुदीचा ठराव अद्याप महासभेत मंजूर झालेला नाही. येत्या महासभेत हा ठराव मंजूर करु, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. सांस्कृतिक कार्यासाठी महापालिकेने २०१२-१३ या वर्षी १० लाख ४२ हजार, २०१३-१४ मध्ये सात लाख ६२ हजार, २०१५-१६ ला १२ लाख १५ हजारांची तरतूद केली होती, तर २०१४-१५ साली अर्थसंकल्पात सांस्कृतिक कार्यासाठी एका रूपयाचीही तरतूद नव्हती. यावरुन पालिकेची सांस्कृतिक कार्याविषयीची अनास्था दिसून येते. यंदाच्या वर्षी ५० लाखांची तरतूद करण्यात आली. त्या व्यक्तिरिक्त कल्याण व डोंबिवलीतील सांगीतिक कार्यक्रमासाठी प्रत्येकी १० लाखांची तरतूद आहे. त्यापैकी ५०लाख संमेलनासाठी आहेत. २०१२ सालापासून करण्यात आलेली तरतूद प्रत्यक्षात ठराव रुपाने मंजूर होऊन संस्थांना वितरित झाली की नाही. प्रत्यक्षात त्याच कामावर खर्च झाली का, याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. >निधीवरून मानापमान नकोच : हळबेसंमेलन डोंबिवलीला होत आहे. ही बाबच मूळात गौरवास्पद आहे. महापालिकेने ठाण्याच्या साहित्य संमेलनाला २५ लाखाचा निधी दिला होता. त्यावेळी मानापमानाचा मुद्दा आला नाही. तर मग तो आताही येता कामा नये. पक्षाला व नेत्यांना विचारात घेतले नाही, या कारणावरुन निधी अडवून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. तरतूद करण्यात आलेला निधी संमेलनाला दिला गेला पाहिजे. संंमेलनासाठी राजकारण बाजू ठेवले गेले पाहिजे, असे स्पष्ट मत मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी मांडले.>यथोचित सन्मान व्हावा : महापौरसाहित्य संमेलन ही शहरासाठी गौरवास्पद बाब असली तरी साहित्य संमेलनात सर्वांचा यथोचित सन्मान व्हावा. हे संमेलन शहराचे वाटावे; तर निधी काय सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका आाहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. संंमेलनासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद केली आहे. संमेलन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. अध्यक्षपदाच्या घडामोडी सुरु आहेत, तर काही बाकी आहेत. त्यामुळे हा निधी देण्याचा ठराव अद्याप केलेला नसला, तरी तो केला जाईल. आगरी यूथ फोरमने संमेलनात सगळ््यांचा यथोचित सन्मान करावा. संमेलन हे शहराचे वाटले पाहिजे, तरच त्याला सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. दोन कोटी द्या : भोईरविरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी सांगितले की, डोंबिवलीत संंमेलन होत आहे ही मानाची बाब आहे. महापालिकेने ५० लाख रुपयांचा निधी ठेवला. ठाण्यातील संमेलनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने २५ लाख रुपयांचा निधी दिला होता. कल्याण डोंबिवली महापालिके इतर महापालिकेस २५ लाख रुपये देते. आपल्या शहरात होत असताना केवळ ५० लाख रुपयांची तरतूद करते. महापालिकेचा वार्षिक अर्थ संकल्प २ हजार कोटी रुपयांचा आहे. केलेली तरतूद पाहता एकूण अर्थ संकल्पाच्या केवळ अर्धा टक्केच तरतूद केली आहे. वास्तविक पाहता संमेलनासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.>सरमिसळ नको : दामले२७ गावांचा मुद्दा वेगळा आहे. आगरी यूथ फोरमने त्याची सरमिसळ संमेलनाशी करु नये, गावांसाठी पालिकेचा निधी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निषेध करणे कितपत योग्य आहे. शहरात संमेलन आहे. त्याला ५० लाखांचा निधी दिला जाईल. त्याला भाजपचा विरोध असण्याचे कारण नाही. निधीचा ठराव लवकर मंजूर व्हावा, यासाठी येत्या महासभेत घेतला जाईल, असे भाजपा नेते राहूल दामले म्हणाले.