शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: 'या' गावात पुढाऱ्यांना 'नो एंट्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:01 IST

विधानसभा निवडणुकीला मतदान न करण्याचा निर्णय सुद्धा या गावकऱ्यांनी घेतला आहे.

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्या प्रश्नांवर आक्रमक होताना दिसत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर ते रघुनाथपूरवाडी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, ग्रामस्थांनी रस्त्याचे काम करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे सातत्याने करून देखील केवळ मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधीनी या मागणीकडे कायम दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयएसओ मानांकित ग्रामपंचायत असलेल्या रघुनाथपूरवाडीला शिऊर गावाने जोडणारा सहा किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाला आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही या रस्त्याचे भाग्य काही उजळले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जो पर्यंत गावाला जोडणारा रस्ता बनत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्याच बरोबर विधानसभा निवडणुकीला मतदान न करण्याचा निर्णय सुद्धा या गावकऱ्यांनी घेतला आहे.

विशेष म्हणजे याच गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकला होता. प्रशासकीय अधिकरी व राजकीय नेत्यांच्या विनंतीनंतर सुद्धा गावकऱ्यांनी आधी रस्ता त्यांनतरचं मतदान करण्याची भूमिका घेतली होती. मात्र अजूनही हा रस्ता बनला नसल्याने आता पुन्हा गावकऱ्यांनी आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधीना आता तर जाग येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.