शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

शिक्षणाची दुकाने नको, गुणवत्ता हवी - मुख्यमंत्री

By admin | Updated: September 24, 2016 03:41 IST

शिक्षणाची केवळ दुकाने उघडून बसण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याची वेळ आली आहे

पुणे : शिक्षणाची केवळ दुकाने उघडून बसण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याची वेळ आली आहे. केवळ पदव्या देऊन चालणार नाही, तर शिक्षणातून कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हायला हवी. तेव्हाच आपण एकविसाव्या शतकातील आव्हानांचा सामना करू शकू. यामध्ये शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.माईर्स एमआयटी येथे आयोजित पहिल्या नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की केवळ पदवी नव्हे, तर मूलभूत ज्ञानही विद्यार्थ्यांना मिळायला हवे, अशी शिक्षणपद्धती तयार करण्याची गरज आहे. आपण किती इंजिनीअर तयार केले यापेक्षा त्यांना किती ज्ञान मिळाले, हे महत्त्वाचे आहे. शिक्षण संस्थांसाठीची नियामक मंडळे कमी असायला हवीत; तसेच महाविद्यालयांना स्वायत्तता मिळावी.देश संक्रमणातून जात असताना अनेक आव्हानांबरोबरच संधीही निर्माण झाल्या आहेत. देशातील तरुणाई ही आपली खरी ताकद आहे. २०२०मध्ये भारत जगातील सर्वांत तरुण देश असेल. पण केवळ युवाशक्तीवर भारत विश्वगुरू बनणार नाही. त्यासाठी या तरुणाईचे रूपांतर कुशल मनुष्यबळात करावे लागणार आहे. त्यासाठी तशी शिक्षणपद्धती, शिक्षक तयार करायला हवेत, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी )>...तर शिक्षकांचेही रँकिंगकार्यक्रमामध्ये टीचर्स काँग्रेसचे निमंत्रक प्रा. राहुल कराड यांनी शिक्षकांचे विषयनिहाय रँकिंगबाबत मांडलेल्या कल्पनेला फडणवीस यांनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘ही चांगली कल्पना आहे. मात्र, शिक्षणाशी संंबंधित विविध घटक आहे. त्यामध्ये शिक्षक संघटनाही आहेत. या संघटनांही रँकिंगला सहमती दर्शविली तर लगेचच समिती नेमून पुढील वर्षीपासून ही प्रक्रिया सुरू करू. लोकशाहीच्या माध्यमातूनच याचा निर्णय घेतला जाईल,’ असे फडणवीस म्हणाले.