शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या एकाही सदस्याने शिवी दिली नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:18 IST

गोंधळाचा विषय माफी मागून संपवण्यात आला होता. तरीही कथानक तयार करून १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. विरोधकांची संख्या कमी केली, तर त्यांची ताकद कमी होईल, असे सरकारला वाटत असेल. पण, तसे होणार नाही. १२ आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई : ओबीसी आरक्षणात सरकारचे अपयश दाखविल्यामुळे आमच्या १२ आमदारांना खोटे आरोप लावून निलंबित करण्यात आले. एक वर्ष काय, ५ वर्ष निलंबित केले तरी त्याची पर्वा नाही. भाजपाच्या एकाही सदस्यांनी शिवी दिली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.गोंधळाचा विषय माफी मागून संपवण्यात आला होता. तरीही कथानक तयार करून १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. विरोधकांची संख्या कमी केली, तर त्यांची ताकद कमी होईल, असे सरकारला वाटत असेल. पण, तसे होणार नाही. १२ आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षण असो की, मराठा आरक्षण हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. याच सरकारने गठीत केलेल्या न्या. भोसले समितीने अतिशय स्पष्टपणे सांगितले असल्याचे ते म्हणाले. 

निलंबित आमदार राजभवनवर -- विधानसभेतील भाजपाच्या निलंबित १२ आमदारांनी सोमवारी राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्यावरील निलंबनाची कारवाई आम्हाला मान्य नसून उलट महाविकास आघाडीच्या सदस्यांनीच हातापाई केल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या निवेदनात केला.- सर्व बाबी स्पष्ट होण्यासाठी राज्यपालांनी संपूर्ण अहवाल मागवावा. तसेच राज्य सरकारला योग्य त्या सूचना, समज द्यावी आणि लोकशाही मूल्यांची गळचेपी आणि अवमुल्यन तातडीने रोखावे, अशी मागणीही त्यांनी केली. - आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, पराग अळवणी, जयकुमार रावल, संजय कुटे, राम सातपुते, हरिष पिंपळे, गिरिष महाजन, अभिमन्यू पवार, किर्तीकुमार भांगडीया आणि नारायण कुचे या निलिंबित बारा आमदारांनी राज्यपालांची भेट घेत निवेदन दिले.

स्वायत्ततेचा अर्थ स्वैराचार होतो का? एमपीएससीला स्वायत्तता आहे पण त्याचा अर्थ स्वैराचार होत नाही. आणखी किती स्वप्निल लोणकरचे बळी घेतले जाणार आहेत, असे खडेबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. राज्य सरकारसमोर एकमेव पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे तत्काळ मागासवर्ग आयोग गठीत करणे. तरीसुद्धा केवळ राजकीय कारणांसाठी ठराव करणे, यातून सरकारला केवळ वेळ मारून न्यायची आहे, हेच दिसून येते. टोलवाटोलवीच्या पलिकडे यातून काहीही साध्य होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.  अजित पवारांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने भाजप सदस्यांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस