शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:11 IST

राज्यात गेल्या काही वर्षांत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही वाढले आहे. यंदा बी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या ३३ टक्के जागा रिक्त राहिल्या असून, १५,९३६ जागांवर प्रवेश झाले नसल्याची स्थिती आहे. अनेक कॉलेजांतील निम्म्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही घट झाली आहे. 

राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) बी. फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. यंदा बी. फार्मसीच्या ५३१ कॉलेजांमध्ये ४८,८७८ जागा होत्या. त्यांपैकी ३२,९४२ जागा भरल्या आहेत. गेल्या वर्षी फार्मसीची ६१ नवी कॉलेजेस सुरू झाली होती. त्यामुळे कॉलेजांची संख्या ५१४ झाली होती. गेल्यावर्षी प्रवेशासाठी ४८,०५१ जागा होत्या. त्यांपैकी ३१,८२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता आणि १६,२२४ जागा रिक्त राहिल्या होत्या. 

विद्यार्थ्यांअभावी कॉलेजे ओस 

दरवर्षी कॉलेजांची संख्या वाढत असल्याने रिक्त जागांची संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांअभावी अनेक कॉलेजेस ओस पडली आहेत. वर्गात विद्यार्थीच नसल्याने कॉलेजांना अभ्यासक्रम चालविणे जिकिरीचे झाले आहे. तसेच पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण प्राध्यापकांची कमतरता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pharmacy Colleges Face 'No Admission' Crisis; Over 15,000 Seats Vacant

Web Summary : B. Pharmacy colleges in Maharashtra face a crisis due to increased seats and declining admissions. Over 15,000 seats remain vacant, with many colleges struggling due to lack of students and resources. The increase in colleges has exacerbated the problem.
टॅग्स :collegeमहाविद्यालयMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र