शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग धोरणावर सरकार करेना कृती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 07:05 IST

बहुप्रतिक्षीत दिव्यांग धोरण जाहीर झाले असले तरी ते प्रसिद्ध करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देधोरण खोळंबले : कृती आराखडा करण्यास होणार विलंबराज्यात २०१४-१५ पासून दिव्यांग धोरण जाहीर करण्याची नुसतीच घोषणास्वराज्य संस्थांनी अर्थसंकल्पामध्ये ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या योजनांसाठी राखीव

विशाल शिर्के पुणे : बहुप्रतिक्षीत दिव्यांग धोरण जाहीर झाले असले तरी ते प्रसिद्ध करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. परिणामी धोरणावर कृती आराखडा तयार करुन केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे दिव्यांग पुनर्वसनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यातच अडथळा निर्माण झाला आहे.  दिव्यांगांसाठी १९९५ मध्ये अपंग अधिनियम अस्तित्वात आला. हा अधिनियम आल्यानंतर दिव्यांग धोरण बनविणे आवश्यक होते. मात्र राज्याला आत्तापर्यंत दिव्यांग धोरणच नव्हते. राज्यात २०१४-१५ पासून दिव्यांग धोरण जाहीर करण्याची नुसतीच घोषणा करण्यात येत होती. अखेर नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशनात धोरण जाहीर करण्यात आले. मात्र, राज्याचे धोरण नक्की काय आहे, हे प्रसिद्धच करण्यात आलेले नाही. केवळ धोरणाचे दीड पानी टीपण जाहीर करण्यात आले आहे. त्या नुसार दिव्यांगाचे आरोग्य, अपंगत्व शीघ्र निदान, शिक्षण, प्रशिक्षण-रोजगार, अडथळामुक्त वातावरण, सहायक सधाने, दिव्यांग मुली आणि स्त्रियांसाठी विशेष तरतूदी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाच्या निधीची तरतूद अशा विविध वीस बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात डिसेंबर २०१६मध्ये केंद्र सरकारने नवीन दिव्यांग कायदा लागू केला. त्यानुसार दृष्टीदोष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगत्व, मानसिक आणि बैद्धिक दिव्यांगत्व, बहुदिव्यांगत्व (मल्टीपल डिसअ?ॅबिलिटी), शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता (आॅटीझम), मेंदूचा पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी), स्नायुंची विकृती, मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्यन अक्षमता अशा विविध २१ प्रवर्गांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या सर्वांचा दिव्यांग योजनेत कसे सामावून घ्यायचे,त्यासाठी आराखडा तयार करावा लागेल.  दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी आरोग्य, शिक्षण, उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था अशा जवळपास सर्व विभागांचा संबंध येणार आहे. ही सर्व मंत्रालयांची संयुक्त जबाबदारीच ठरणार आहे. त्यासाठी धोरण, त्यावरील कृती आराखडा याला ठोस कायदेशीर स्वरुप येणे आवश्यक आहे. तसे नसल्यास धोरणाची अंमलबजावणीच करणे शक्य होणार नाही. कारण प्रत्येक विभागाला धोरणाप्रमाणे काम करण्यासाठी कृती आराखडा आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागेल. त्यासाठीचे धोरण जाहीर झाल्यानंतरही प्रसिद्ध होत नसल्याने पुढील अत्यावश्यक कायदेशीरबाबी प्रलंबित राहिल्या आहेत. ---तीव्र अपंगांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावे लागणार अधिक लक्षस्थानिक स्वराज्य संस्थांनी अर्थसंकल्पामध्ये ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या योजनांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातील निधीच्या ५० टक्के निधी तीव्र अपंगत्व, बौद्धिक आणि उच्च आधाराची आवश्यकता असलेल्या दिव्यांगावर खर्च करणे आवश्यक असेल. त्यासाठी नियमावली गरजेची आहे. तरच, स्थानिक स्वराज्य संस्थांना त्या नुसार काम करता येईल. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार