शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

राजकीय दबावामुळे कारवाई नाही

By admin | Updated: February 1, 2017 02:14 IST

राजकीय पक्षांच्या दबावामुळे बेकायदा होर्डिंग, बॅनर्स व पोस्टर्सवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने

मुंबई: राजकीय पक्षांच्या दबावामुळे बेकायदा होर्डिंग, बॅनर्स व पोस्टर्सवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने आता केंद्र व राज्य निवडणूक आयोगानेच याला आळा घालण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी काही मागदर्शक तत्त्वे आखली आहेत. याच मागदर्शक तत्त्वांमध्ये सार्वजनिक संपत्ती विद्रूप न करण्यासंदर्भात अट घालावी, अशी सूचना न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने केली. केंद्रीय व निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना किंवा उमदेवारांना घातलेल्या वेगवेगळ्या अटी किंवा नियमांबरोबरच बेकायदा बॅनर्स, होर्डिंग किंवा पोस्टर्स लावून शहराचा चेहरा विद्रूप न करण्याच्या अटीचा किंवा नियमाचा समावेश करणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले.बेकायदा होर्डिंग, बॅनर्स आणि पोस्टर्स हटवण्याच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी दोन सदस्यांची समिती नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्यात नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश करा, असेही खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले.स्थानिक सुकाणू अधिकारी (नोडल आॅफिसर), स्थानिक पोलीस, नागरी व महसूल अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला या द्विसदस्यीय समितीला अहवाल सादर करावा आणि ही समिती कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित राजकीय पक्षांची नावे सरकारच्या संकेतस्थळावर टाकतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस काहीच कारवाई केली जात नाही, अशी तक्रारही काही याचिकाकर्त्यांनी खंडपीठाकडे केली. याची दखल घेत, उच्च न्यायालयाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या इनचार्जला कोणी बेकायदा होर्डिंग, बॅनर्सकिंवा पोस्टर्ससंबंधी तोंडी तक्रार केली, तरी त्या तक्रारीची दखल घेऊन एफआयआर करण्याचे निर्देश दिले. ‘जर तुम्ही (पोलीस) कारवाई केली नाहीत, तर तुमच्याविरुद्ध आदेशाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करू, तसेच खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश देऊ,’ अशी तंबीच उच्च न्यायालयाने पोलिसांना दिली. (प्रतिनिधी) होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेशबेकायदा होर्डिंग, बॅनर्स किंवा पोस्टर्स लावून शहराचा चेहरा विद्रूप करण्यात येतो, तसेच स्थानिक संस्थांचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यात येत असल्याने, अशा प्रकारचे बेकायदा कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश संबंधित स्थानिक संस्थांना व सरकारला द्यावा, अशी मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात सातारा येथील सुस्वराज्य फाउंडेशन व मुंबईच्या जनहित मंच या एनजीओंचा समावेश आहे.