शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणे : जेल की बेल? आज फैसला येणार; नारायण राणेंना पोलिसांची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 08:13 IST

Nitesh Rane : जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही.  हांडे यांच्या न्यायालयात अपूर्ण राहिलेली सुनावणी घेण्यात आली.

ओरोस (सिंधुदुर्ग) : राज्याचे लक्ष लागलेल्या  शिवसैनिक हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. यावर उद्या न्यायालय निर्णय देणार आहे.

१८ डिसेंबरला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारक संतोष परब यांच्यावर हल्लाप्रकरणी ६ संशयितांना अटक केली. ‘स्वाभिमान’चे पुण्यातील कार्यकर्ते सचिन सातपुतेंच्या अटकेनंतर पोलिसांची चक्रे आ. राणे व संदेश सावंत यांच्या दिशेने फिरली. त्यामुळे या दोघांनी २७ डिसेंबरला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही.  हांडे यांच्या न्यायालयात अपूर्ण राहिलेली सुनावणी घेण्यात आली.  दरम्यान, कामात व्यस्त असल्याने पोलीस ठाण्यात हजर राहू शकत नाही; आवश्यकता असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधू शकतो, अशा आशयाचे पत्र राणे यांच्या वतीने पोलिसांना दिल्याचे समजते.

राणेंचे वकील, सरकारी वकिलांमध्ये जोरदार खडाजंगीयावेळी सरकारी पक्षाच्यावतीने तिघे तर नीतेश राणे यांच्यावतीने सहा वकिलांची फौज होती. नीतेश राणे यांचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जाेरदार खडाजंगीही झाली.   

नितेश राणे कोठे आहेत? - नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू असतानाच पोलीस त्यांच्या शोधासाठी जंगजंग पछाडत आहेत.  - त्या अनुषंगानेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याबाबत बुधवारी नोटीस बजावण्यात आली. राणे यांच्या निवासस्थानावरील भिंतीवर ही नोटीस डकवण्यात आली.- मंत्री राणे यांनी ‘आमदार नितेश राणे कुठे आहेत, ते सांगायला मला मूर्ख समजता का? ’ असा सवाल मंगळवारी पत्रकारांना केला होता. त्याअनुषंगानेच ही नोटीस बजावल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे