शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

Nawab Malik: तो गोसावी हा नव्हेच! निरंजन डावखरेंनी समोर आणला पत्नीच्या कंपनीतील सारख्याच नावाचा संचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 09:21 IST

Niranjan Davkhare on Nawab Malik allegations: नवाब मलिकांचा ‘गोसावी बार’ ठरला फुसका; नामसाधर्म्यामुळे पत्नीविरुद्ध आरोप केल्याचा दावा. मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे स्नॅप शॉट्स शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  :  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी हा भाजप आमदाराच्या पत्नीच्या कंपनीत संचालक असल्याचा केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. डावखरे यांनी कंपनीत संचालक असलेल्या किरण गोसावी यांना हजर केले. हे ते गोसावी नाहीत. मात्र केवळ नामसाधर्म्याचा लाभ घेऊन समाजमाध्यमांमध्ये स्नॅप शॉट्स  व्हायरल करून बदनामी केल्याबद्दल सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे स्नॅप शॉट्स शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. त्या स्नॅप शॉटसमध्ये डावखरे यांच्या पत्नीचे नाव गोसावी यांच्यासोबत दिसत होते. त्यामुळे डावखरे यांनी किरण प्रकाश गोसावी याला शनिवारी पत्रकारांसमोर हजर केले. तसेच त्याच्याकडील पुरावे सादर केले. आर्यन खानच्या माध्यमातून स्वत:चा पर्सनल अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करणारे मलिक तोंडघशी पडल्याची टीका डावखरे यांनी केली.

या प्रकारात ‘खोदा पहाड निकला चुहा’, अशी मलिकांची स्थिती झाली असल्याचे ते म्हणाले. मित्र परिवाराने आणलेला गांजा पिऊन व खोटी माहिती देऊन कोणीही दिशाभूल करू नये, असा टोला त्यांनी लगावला. ट्र्यू  पॅथलॅबचे संचालक असलेल्या किरण प्रकाश गोसावी यांच्या आणि आर्यन प्रकरणातील गोसावी यांच्यात नामसाधर्म्य आढळल्यानंतर बदनामी करण्याचा डाव शिजला, असे ते म्हणाले. दीड महिन्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गौप्यस्फोट करण्याचे मलिक यांनी जाहीर केले आहे. परंतु हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरी, पूर परिस्थिती, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची चर्चा टाळण्याबरोबरच विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाणार आहे हाच त्या वक्तव्याचा अर्थ आहे.

दरम्यान, गुरुवार ७ ऑक्टोबर रोजी पुणे पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना मी माझी कागदपत्रे व पासपोर्ट दाखवला. केवळ नावात साम्य असल्यामुळे मला नाहक त्रास झाला, असे ट्र्यू पॅथलॅबचे संचालक किरण गोसावी यांनी सांगितले.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी