शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात, मदतकार्यादरम्यान ओव्हरहेड वायर पडल्यानं रेल्वेचे 6 कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 12:53 IST

कल्याण, दि. 29 - आसनगाव आणि वाशिंद दरम्यात वेहरोळी वस्तीजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसल्याने वाहतूक सेवेवर परिणाम ...

कल्याण, दि. 29 - आसनगाव आणि वाशिंद दरम्यात वेहरोळी वस्तीजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसल्याने वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मदतकार्य करताना डोक्यावर ओव्हर हेड वायर पडल्याने रेल्वे प्रशासनाचे 6 कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी कर्मचा-यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  आसनगाव आणि वाशिंददरम्यात वेहरोळी वस्ती जवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरले आहेत. यानंतर घटनास्थळी मदत कार्यासाठी रेल्वे कर्मचारी दाखल झाले. मदतकार्य करत असताना अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे ओव्हरहेड वायर डोक्यावर पडल्यामुळे हे सहा कर्मचारी जखमी झाल्याचे बोलले जात आहे. 

जखमी कर्मचा-यांची नावेरामाराघो मेंगाल यशवंत  दारकू भगत मंगळू राजू वारघडे रामा भिका वाघ सखाराम दादू मांगे शिवराम बुधा ठाकरे  

जखमी कर्मचा-यांपैकी यशवंत दारकू भगत यांच्या डोक्याला गंभीर जखम झालेली आहे. त्यामुळे टाके घालावे लागणार असल्याची माहिती रेल्वे मेडीकल टीमतर्फे देण्यात आली आहे.

आसनगाव आणि वाशिंद दरम्यात वेहरोळी वस्तीजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाला आहे.  रेल्वे रुळावर पावसामुळे दगड-माती आल्यानं सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे चालकाला अंदाज आला नाही. मात्र वेळीच प्रसंगावधान दाखवून चालकान ब्रेक लावला व मोठी दुर्घटना टळली.  एक्स्प्रेसच्या इंजिनसह 9 डब्बे रुळावरुन घसरले आहेत.  या अपघातामुळे मुंबईकडे येणारी अप आणि-डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सुदैवानं  या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  मात्र काही प्रवासी गंभीर स्वरुपात जखमी झाल्याचे वृत्त आहे.  रेल्वे पोलीस,  डॉक्टरांचं पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.   इंजिनशिवाय SLR, H1, A1, A2, A3, B1, B2, B3, B4 हे डबे घसरले आहेत. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग कमी होता. तसंच डबे रुळावरुन घसरल्यानंतर काही प्रवासी बर्थवरुन पडून किरकोळ जखमी झाल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

हेल्पलाईन क्रमांकसीएसटीएम 022-22694040,ठाणे 022-25334840,कल्याण 0251– 2311499,दादर 022-24114836,नागपूर 0712-2564342

लोकल विस्कळीत9 डबे घसरल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी एक दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याण आणि कसारा दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.नागपूरहून मुंबईला येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस,  अमरावती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस रखडल्या आहेत.

गाड्यांची स्थितीफिरोजपूर-सीएसएमटी पंजाब मेल इगतपुरीजवळ थांबलीमनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस इगतपुरीजवळ थांबलीमनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरीजवळ रखडलीमनमाड-एलटीटी एक्स्प्रेस आज रद्द

स्टेशन्सवर खोळंबलेल्या रेल्वे गाड्यासेवाग्राम, जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाडला उभीगरीबरथ लासलगावला उभीजनता एक्स्प्रेस अस्वली स्टेशनला उभीपंचवटी एक्स्प्रेस घोटीला तर पंजाब मेल इगतपुरीत थांबून आहे

टॅग्स :Accidentअपघातcentral railwayमध्य रेल्वे