शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आनंद दिघेंची हत्या करून मृत्यू झाल्याचं भासवलं, निलेश राणेंचा बाळासाहेबांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 21:09 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

रत्नागिरी- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित असून, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आल्याचे निलेश राणे म्हणाले आहेत.एवढ्यावरच न थांबता निलेश राणेंनी अनेक घणाघाती आरोप केले आहेत. कर्जतच्या फार्म हाऊसवरही बाळासाहेबांच्या सांगण्यावरून दोन शिवसेनेच्या नेत्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, असं म्हणत निलेश राणेंनी बाळासाहेबांवर निशाणा साधला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. निलेश राणे यांनी केलेले आरोप जसेच्या तसे देण्यात आले आहेत.

“आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली. राणे साहेबांनीही पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलंय, त्याबद्दल कधी बोललो नाही. कारण आम्हाला आमची मर्यादा माहित होती. आणि आमचे राणेसाहेब बाळासाहेबांवर आजही एवढे प्रेम करतात, की त्यांना ते कधी सांगता आलं नाही. पण एक मुलगा म्हणून, मी त्यांना साहेब जरी म्हणत असलो, तरी ते आधी माझे वडील आहेत. त्यांचा जाहीर कार्यक्रमात कुणी अपमान करत असेल, तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल.आनंद दिघेंचं खरं काय झालं? कट कसा रचला गेला आणि त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आलं. आणि हे दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही. त्या शिवसैनिकांना ठार मारायाचा बाळासाहेबांनी कुणाला आदेश दिला आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. जे दिघेसाहेबांबद्दल झालं, ते चुकीचं वाटलं शिवसैनिकांना म्हणून बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन त्या दोघांना ठार मारलं गेलं.मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, मात्र राणेसाहेबांबद्दल जर कुणी खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, तर मी सहन करणार नाही. माझ्यासाठी राणेसाहेब महत्त्वाचे आहेत, बाळासाहेब माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. जेवढी मर्यादा आम्ही ठेवली होती, ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर ठेवली नाही.त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचं होतं बाळासाहेबांना. अनेकवेळा सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना (सोनू निगम) विचारा, आज ते सांगतीलही. घाबरले असतील, मात्र, आज बाळासाहेब नाहीत, तर सांगतीलही. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसैनिक गेले होते. काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं, हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल, जाहीर सभेमध्ये सांगेन.बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कुणा-कुणाचे मृत्यू झाले? कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर? हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन. आमच्या नादाला लागायचं नाही. राणे म्हणतात आम्हाला. आजपर्यंत राणेसाहेब कधीही बोलले नाहीत. बाळासाहेबांनी केलं, त्यांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. पण आमच्या राणेसाहेबांचा मानसन्मान कुणी ठेवायचा? बाळासाहेब बोलत होते, ते आम्हाला चालत होतं. आम्हाला काही फरक पडत नव्हता. पण असे गल्लीबोळातले गटरछाप (विनायक राऊत) बोलायला लागले, तर आम्ही गप्प बसायचं?

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेNilesh Raneनिलेश राणे