शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

निगुडघर-साळव रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: July 4, 2016 01:35 IST

१५ गावांना जोडणाऱ्या निगुडघर-साळव रस्त्यावरील नीरा नदीवरील पूल ते नीरा देवघर उजव्या कालव्यापर्यंतच्या अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली

भोर : नीरा देवघर धरणातील रिंगरोडवरील १५ गावांना जोडणाऱ्या निगुडघर-साळव रस्त्यावरील नीरा नदीवरील पूल ते नीरा देवघर उजव्या कालव्यापर्यंतच्या अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यात चिखल, पाणी साचून राडारोडा झाला आहे. या चिखलात गाड्या घसरून पडून अपघात होत आहेत. गेल्या १० वर्षांपासून पाटबंधारे विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास १५ गावांतील सरपंच व ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.नीरा देवघर धरणांतर्गत रिंगरोडवरील साळव, रायरी, धारांबे, कंकवाडी, पऱ्हर बु, परहर खुर्द, निवंगण, गुढे, शिरवली हि.मा, माझेरी कुडली बु, कुडली खु, दुर्गाडी, अभेपुरी धानवली या गावांसह भावेखल अंगसुळे,कारी ही गावेही या रस्त्याचा वापर करतात. १९९० साली नीरा देवघर धरणाचे काम सुरू झाले. त्या वेळी धरणाच्या कामासाठी अवजड वाहने घेऊन जाण्यास हा रस्ता बांधकाम विभागाकडून पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्याला १५ ते २० वर्षे त्यानंतर कालवाधी झाला; मात्र निगुडघर-साळव रस्त्याची एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे निगुडघर गावापासून नीरा नदीवरील पूल ते उजव्या कालव्यापर्यंतच्या रस्त्याला खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. साईडपट्ट्या खचल्याने, तसेच पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. या रस्त्याची डागडुजी करावी म्हणून पाटबंधारे विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीच कार्यवाही केली जात नाही. बांधकाम विभागाच्या वादात अडकला रस्तानिगुडघर-साळव हा रस्ता पूर्वी बांधकाम विभागाकडे होता. तो पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभाग सदरच्या रस्त्याचे काम करीत नाहीत आणि पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने विभागांच्या वादात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.