शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

निघोजचे हत्याकांड 'सैराट' नव्हेच; पतीच निघाला मारेकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 20:21 IST

रुक्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेले प्रकरण ऑनर किलिंगचे नसून पतीनेच पत्नीला जाळल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जखमी झालेला फियार्दी पती मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून स्पष्ट झाल्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस अधिक्षक मनिष कलावाणिया यांनी सांगितले.   

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक मनीष कलवानीया, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देत स्थानिक व्यक्तींकडे, रुक्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. सहा महिन्यांपूर्वी मंगेश व रुक्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. विवाहाला दोघांच्याही कुटुंबांचा विरोध नव्हता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच मंगेशने रुक्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणांवरून तो तिला मारहाण करायचा. घटनेच्या आधी सलग तीन दिवस मंगेशने रुक्मिणीला मारहाण करत होता. या मारहाणीला कंटाळून रुक्मिणी माहेरी निघून गेली. त्यानंतर रुक्मिणीची आई मोलमजुरीला जाताना रुक्मिणी व तिच्या लहान भावंडांना घरात ठेवून दाराला बाहेरुन कुलूप लावत असे. घटनेच्या दिवशी घरात रुक्मिणीसह तिची लहान भावंडे, निंनचू (६), करिश्मा (५), विवेक (३) होते. आई घराला बाहेरुन कुलूप लावून मोलमजुरीसाठी निघून गेली. वडीलही मजुरीसाठी बाहेर पडले होते. 

रूक्मिणीच्या आई-वडीलांचे घर लाकडी खांडांचे आहे. घराच्या माळवदाचे एक खांड पडलेले आहे. याची संधी साधत १ मे रोजी मंगेशने पडलेल्या भागातून घरातून प्रवेश केला. मंगेशने सोबत बाटलीतून पेट्रोल आणले होते. सोबत आणलेले पेट्रोल मंगेशने रुक्मिणीच्या अंगावर ओतले व तिला पेटवले. रुक्मिणीने पेट घेतल्यावर तिने मंगेशला मिठी मारली. आरडाओरडा व घरातून येणारे धुराचे लोट पाहून परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजाला कुलूप असल्याने टिकावाच्या सहाय्याने दरवाजा तोडण्यात आला. गंभीर भाजलेल्या अवस्थेतील रूक्मिणी स्वत: घराबाहेर आली. तिच्या पाठोपाठ मंगेशही आला. रुग्णवाहिकेतून रुक्मिणीला व मंगेशला सुरुवातीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. पुण्यात उपचारांदरम्यान रुक्मिणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंगेशच्या फिर्यादनुसार रूक्मिणीच्या ऑनर किलिंगचा गुन्हा दाखल केला. मात्र, पोलीस तपासात फिर्यादी पतीच मारेकरी निघाला. आज पोलिसांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ही बाब स्पष्ट केली आहे. पती मंगेश चंद्रकांत रणसिंग यांच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Murderखून