शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

झाकीर नाईकविरोधात NIA कोर्टानं अजामीनपात्र अटक वॉरंट केलं जारी

By admin | Updated: April 20, 2017 18:48 IST

इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकविरोधात एनआयए कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकविरोधात एनआयए कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. दहशतवादी कृत्याला चिथावणी देऊन समाजांत द्वेष पसरवण्याचा आरोप नाईकवर ठेवण्यात आला आहे. याआधी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. झाकीर नाईकविरोधातील तपासात ईडीकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने एनआयएने न्यायालयात धाव घेऊन अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याची विनंती केली होती. नागरिकांना उपदेशाच्या नावाखाली हिंसक कारवाया करण्यासाठी चिथावणी देणे, नागरिकांच्या धार्मिक भावना भडकावणे असे गंभीर आरोप ठेवत झाकीर नाईकविरोधात 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याचा आदेश येथील विशेष न्यायालयाने दिला होता. मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात नाईक जबाब नोंदविण्यासाठी तीनदा समन्स काढूनही हजर न झाल्याने अजामीनपात्र वॉरंटसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अर्ज केला होता. अनिवासी भारतीय असलेल्या नाईकचे वास्तव्य सध्या आखाती देशांत असल्याचा कयास आहे. आता या वॉरंटआधारे त्याच्या प्रत्यार्पणासाठी किंवा इंटरपोलच्या माध्यमातून त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यास बळकटी मिळेल.राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बेकायदा कारवाई प्रतिबंधक कायद्यान्वये नोंदविलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने नाईक व इतरांविरुद्ध मनी लॉड्रिंगची फिर्याद नोंदविली आहे. आरोपींनी गुन्ह्यातून मिळविलेला पैसा काळ्याचा पांढरा केला, असा आरोप असून ईडीला त्या अनुषंगाने जाबजबाब घ्यायचे आहेत. 51 वर्षांचा नाईक इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आणि पीस टीव्ही चालवितो. पीस टीव्हीवर त्याची इस्लामी धर्मशास्त्रावरील प्रवचने प्रसारित होतात. गेल्या वर्षी बांगलादेशात ढाकातील उपाहारगृहात स्फोट झाल्यानंतर अटक केलेल्यांपैकी काहींनी नाईक यांच्या प्रवचनांवरून स्फूर्ती घेतल्याची कबुली दिली. यानंतर त्यांच्याविरुद्ध समाजात वितुष्ट निर्माण करणे याखेरीज बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. याखेरीज केंद्र सरकारने स्वतंत्र कारवाई करून इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालून देणगी स्वीकारण्यास प्रतिबंध केला.