शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नवे वर्ष शिक्षकांचे! ६० शाळांना अनुदानाचा टप्पा घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 07:47 IST

शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, सहा हजार १० प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच १४ हजार ८६२ तुकड्यांना अनुदान मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ६३,३३८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील सहा हजार शाळांना १,१६० कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई जिल्ह्यातील जवळपास ६० शाळांचे अनुदान विविध टप्प्यांत वाढणार आहे. निश्चितच अनुदान वाढीमुळे या शाळांतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाच्या माध्यमातून मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अघोषित शाळांना २० टक्के, २० टक्के अनुदानांवरील शाळा ४० टक्के, ४० टक्क्यांवर शाळांना ६० टक्के अनुदान मिळणार आहे.शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, सहा हजार १० प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच १४ हजार ८६२ तुकड्यांना अनुदान मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ६३,३३८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्रुटींच्या पूर्ततेनंतर २० टक्के अनुदानासाठी ३६७ शाळा पात्र असून ४० टक्के अनुदानासाठी २८४ शाळा पात्र आहेत. सद्य:स्थितीत २० टक्के अनुदान घेत असलेल्या २२८ शाळांना ४० टक्के अनुदान मिळेल तर ४० टक्के अनुदान घेत असलेल्या २००९ शाळांना ६० टक्के अनुदान मिळणार आहे.  मुंबईत किती शाळा सध्या ४० टक्के अनुदान असलेल्या ४० शाळा असून त्यांना टप्पावाढीनंतर ६० टक्के अनुदान मिळणार आहे.२० टक्के अनुदानित १२ शाळांना टप्पावाढीनंतर ४० टक्के अनुदान मिळणार आहे तर जवळपास सहा ते सात शाळांना पहिल्यांदाच २० टक्के अनुदानाचा टप्पा मिळणार आहे.

त्रुटींची पूर्तता करण्यास शेवटची संधीशाळांना त्रुटी पूर्ततेसाठी एक महिन्याची संधी मूल्यांकनानुसार अनुदानास पात्र; परंतु, शासनाच्या स्तरावर अद्याप घोषित न केलेल्या ३,१२२ शाळांना २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्रुटींची पूर्तता करण्यास शेवटची एक महिन्याची संधी दिली आहे.  

विनाअनुदानित शाळा?मुंबई जिल्ह्यात विनाअनुदानित शाळा ही आहेत. त्यांना अनुदान मिळविण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचा सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

राज्यातील सहा हजार शाळांना १,१६० कोटींचे अनुदान देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. आम्ही आंदोलन, निवेदनाच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याची सरकारने दखल घेतली. शासन आदेश त्वरित काढण्यात यावा. अनुदान प्राप्त शाळांच्या याद्यांची घोषणा शासनाने लवकर करावी.  - खंडेराव जगदाळे, राज्य उपाध्यक्ष, कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लढ्याला मिळालेले हे यश असून याची पुढची कार्यवाही सरकारने लवकर करावी आणि त्यांना आर्थिक दिलासा द्यावा. शाळांच्या अनुदानात दरवर्षी टप्प्याटप्याने वाढ करावी.- संजय डावरे, अध्यक्ष,  विनाअनुदानित कृती समिती, मुंबई

टॅग्स :Teacherशिक्षक