मुंबई : वैद्यकीय उपकरणांचा गैरवापर, एकाच रुग्णासाठी असलेले उपकरण परत अन्य रुग्णांसाठी वापरणे आदी गैरप्रकारांना रोखण्यासाठी केंद्र सरकार व संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने वेब पोर्टल तयार करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसच सतेज पाटील यांनी विनापरवाना वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन व विक्री करणा-या कंपन्यांविरूद्ध कारवाई करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. बापट म्हणाले की, केंद्र सरकारच्या मदतीने एक वेब पोर्टल तयार करण्यात येत आहे.९२ लाख शिधापत्रिका रद्दराज्यातील दोन कोटी ४७ लाख शिधापत्रिकांपैकी ९२ लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांनी एका लेखी उत्तरात सांगितले. भाजपा सदस्य अपूर्व हिरे व इतर सदस्यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.राज्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांमधली शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीतल्या (अॅप्टिट्यूट टेस्ट) गुणांच्या आधारे केली जाईल. या पद्धतीची पहिली चाचणी सहा महिन्याच्या आत घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका लेखी उत्तरात सांगितले. जगन्नाथ शिंदे व इतर सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. राज्यात शिक्षक व मुख्याध्यापकांची ३० हजारांहून जास्त पदे रिक्त असल्याचेही तावडे यांनी कबुल केले.
वैद्यकीय उपकरणांवरील नियंत्रणासाठी वेब पोर्टल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:36 IST