शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

नांदेड ते मुंबई लवकरच नवीन रेल्वे

By admin | Updated: June 22, 2017 18:26 IST

प्रवाशांची मागणी लक्षात घेता नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी लवकरच नांदेड मुुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलसाठी लवकरच नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 22 - प्रवाशांची मागणी लक्षात घेता नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी लवकरच नांदेड मुुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलसाठी लवकरच नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. याच बरोबर नांदेड नागपूर ही गाडी आठवड्यातून एक दिवस असून या गाडीला प्रवाशांनी जास्तीत जास्त पसंती देवून दैनंदिन गाडी सुरू होण्यासाठी प्रवाशांनी मदत करावे असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व्ही.के.यादव यांनी नांदेड दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत असतांना म्हणाले.
 
मुदखेड परभणीच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी गती देण्यासाठी प्रत्येक्ष पाहणी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व्ही.के.यादव हे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत नांदेड विभागाचे व्यवस्थापक ए.के.सिन्हा, स्टेशन मास्तर समीर कुमार यांच्यासह नांदेड विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
 
सुरूवातीला यादव यांनी रेल्वे स्थानकावरील सुविधेची पाहणी करुन आढावा घेतला. डाक विभाग, उपहारगृह, प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या प्रतिक्षालयाची पाहणी याचबरोबर सुरक्षेच्या बाबतीचा आढावा या सर्व गोष्टी त्यांनी रेल्वे स्थानकांची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. परळी रेल्वे स्थाकनापासून पाहणी दौरा सुरू केला असून यामध्ये त्यांनी परळी , गंगाखेड, परभणी, पुर्णा या स्थानकांचीही पाहणी त्यांनी केली. यामध्ये गंगाखेड येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाची माहिती घेतली व लवकरच या पुलाचे काम सुरू केले जावून पुर्णत्त्वास नेले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेत त्यांनी व्यक्त केले. यामुळे गंगाखेड येथील पुल पुर्णत्त्वास जाणार असल्याचे सांगितले. याचबरोबर नांदेड रेल्वे स्थानकांच्या विकासाठी रेल्वे प्रशासन कठीबध्द असून प्रवशांना जास्ती जास्त सुविधा देण्यासाठी रेल्वे विभाग तयार आहे. याच बरोबर नांदेड रेल्वे स्थानकावरुन नवीन गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नांदेड मुंबई ही गाडी लवकरच सुरू होणार आहे. या गाडीला अकोला पुर्णा, लिंक जोडण्यात येणार असून अकोला भागातील प्रवाशांनाही मुंबईला जाण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुदखेड -परभणी या डबल लाईनचे काम येत्या दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2018 पर्यंत पुर्ण करायचे आहे. पण याच्या अगोदर काम पुर्ण होईल का याचीही पाहणी सुरू आहे. दोन टप्प्यात काम असून पहिला टप्पा मार्च 2018 त्यानंतरचा दुसरा टप्पा डिसेंबर 2018 असा राहणार आहे.
 
यापाठी मागे पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीतही व या भागातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून असून नांदेड-नागपूर या गाडीची यासाठी आठवड्यातून एक दिवस सध्या चालविली जात आहे. पण या गाडीला सध्या अत्यअल्प प्रतिसाद असून या गाडीला प्रवशीां जास्ती जास्त पसंती देवून दैनंदिन गाडी सुरू करण्यासाठी मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नांदेड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 या ठिकाणी अधिक लांबची गाडी थांबू शकत नाही. यामुळे यावरही सुरूस्ती तसेच प्रवाशांना प्लॅटफार्म बदलण्यासाठी नवीन उडाण पुलाची आवश्‍यकता असून यासाठी लवकरच रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठून नवीन उडाण पुलाची मंजूरी घेवून काम सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले. जास्ती जास्ती नांदेडकरांना रेल्वेच्या सुविधा देण्यासाठी रेल्वे बोर्ड तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात नांदेड विभागासाठी निधी उपलब्ध झाला असून विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर उमरी, धर्माबाद व गंगाखेड येथील पणवेल व नगरसोल नर्सापूर या गाड्यांना थांबा देण्यासाठी विचाराधी असल्याचे सांगितले.