शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नव्या मंत्र्यांचा मुक्काम सध्या विधान भवनात

By admin | Updated: July 12, 2016 03:51 IST

चार्ज घ्यायचा म्हणजे करायचे तरी काय, असा प्रश्न आज नव्या मंत्र्यांना पडला. तर काहींची सुरुवातच थेट बैठका घेण्याने झाली. काही मंत्र्यांनी सिद्धिविनायकाला साकडे घालून कामाची सुरुवात केली.

अतुल कुलकर्णी,  मुंबईचार्ज घ्यायचा म्हणजे करायचे तरी काय, असा प्रश्न आज नव्या मंत्र्यांना पडला. तर काहींची सुरुवातच थेट बैठका घेण्याने झाली. काही मंत्र्यांनी सिद्धिविनायकाला साकडे घालून कामाची सुरुवात केली.आपल्याला कोणत्या मजल्यावरचे दालन मिळेल याची चाचपणी करत अनेक मंत्री मंत्रालयात आले खरे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतरच दालनांचे वाटप केले जाईल, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्यामुळे सर्व नव्या मंत्र्यांचा तात्पुरता मुक्काम विधान भवनात हलविण्यात आला. अधिवेशन काळात मंत्र्यांना विधान भवनातील दालने दिली जातात. त्यातल्याच काही दालनांवर नव्या मंत्र्यांच्या नावाचे कागद चिकटवून त्यांच्या पाट्या तयार केल्या गेल्या; आणि या मंत्र्यांनी आपल्या दालनात प्रवेश केला.संभाजी पाटील निलंगेकर निघाले तेव्हा घरच्यांनी विचारले की, ‘चार्ज घ्यायला जाताय का?’ विधान भवनात आल्यानंतर त्यांना कोणी चार्ज देणारेच नव्हते. मग एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपण मंत्र्यांच्या खुर्चीवर बसा आणि काम सुरू करा, म्हणजे आपोआप चार्ज घेतल्याचे समजले जाईल. फारतर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून आपण चार्ज घेतल्याची बातमी काढायला लावा, असा सल्लाही दिला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या दालनात आडत व्यापाऱ्यांच्या संपाबद्दल बैठक बोलावली होती. त्यासाठी नवे सहकारमंत्री सुभाष देशमुख तेथे पोहोचले. त्यांचे तेथे स्वागत झाले आणि त्यांनी बैठकीला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या महादेव जानकर यांचीही सुरुवात त्याच बैठकीने झाली. त्या बैठकीत कोणताच निर्णय न झाल्याने पुन्हा सायंकाळी बैठक घेण्याचे ठरले. सुभाष देशमुख यांनी दुपारचे जेवण नरिमन पॉइंट भागातील एका साध्या हॉटेलात घेतले. मुख्यमंत्र्यांकडे असणारे पर्यटन खाते मिळालेले जयकुमार रावल मंत्रालयात फेरफटका मारून विधान भवनात गेले. पत्रकार, अधिकारी भेटले, की ते तुम्ही नक्की या, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, असे आपुलकीने सांगताना दिसत होते. काही जुन्या मंत्र्यांनी त्यांच्याकडच्या खासगी सचिवांना दुसऱ्या मंत्र्यांकडे पाठवता येते का? याची चाचपणी सुरू केली होती.