शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

दोन्ही सभागृहांत डान्सबार बंदीचा नवा कायदा मंजूर

By admin | Updated: June 14, 2014 05:02 IST

डान्सबारची छमछम कायमची बंद करण्यासाठी सर्वंकष अशा कायद्याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी शुक्रवारी मंजुरी दिली.

मुंबई : डान्सबारची छमछम कायमची बंद करण्यासाठी सर्वंकष अशा कायद्याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी शुक्रवारी मंजुरी दिली. नवीन कायद्याच्या परिघात फाईव्ह स्टार आणि थ्री स्टार हॉटेल्सदेखील आली आहेत. पूर्वीच्या कायद्यातील त्रूटी दूर करून न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल, असा हा कायदा तयार करण्यात आल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले. नवीन कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी सकाळी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर या कायद्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडण्यात आले आणि सभागृहांनी ते एकमताने मंजूर केले. नवीन कायदा करताना सांस्कृतिक कला आणि लोकनृत्यांवर बंदी आणली जाणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. नवीन कायद्यानुसार खाद्यगृहामध्ये, परमीट रूममध्ये किंवा बीअर बारमध्ये कोणत्याही तऱ्हेचा किंवा प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करण्यासाठी परवाना प्राधिकारी असलेल्या पोलीस आयुक्ताने किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याने किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याने वरील नियमांनुसार दिलेले नृत्याविष्कार परवाने रद्द होतील. खाद्यगृहामध्ये, परमीट रूममध्ये किंवा बीअर बारमध्ये कोणत्याही तऱ्हेचा किंवा प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करण्यावर बंदी घालण्यात येत आहे. खाद्यगृहामध्ये, परमीट रूममध्ये किंवा बीअर बारमध्ये कोणत्याही तऱ्हेचा किंवा प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करणाऱ्या किंवा आयोजित करण्याची व्यवस्था करणाऱ्या किंवा तशी परवानगी देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस दोष सिद्ध झाल्यानंतर कमीतकमी तीन महिने ते जास्तीतजास्त तीन वर्षे कारावास आणि कमीतकमी एक लाख ते जास्तीतजास्त ५ लाखांपर्यंत दंडाची शिक्षा असू शकेल. एखाद्याचा परवाना रद्द करण्यात आले आहे, अशी कोणतीही व्यक्ती तिच्या खाद्यगृहामध्ये, परमीट रूममध्ये किंवा बीअर बारमध्ये कोणत्याही तऱ्हेचा किंवा प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करत आहे, आयोजित करण्याची व्यवस्था करत आहे किंवा आयोजनाची परवानगी देण्यात येत आहे असे परवाना प्राधिकाऱ्याच्या निदर्शनास आले तर कलम ३३अन्वये खाद्यगृह म्हणून दिलेले नोंदणी प्रमाणपत्र आणि परमीट रूम किंवा बीअर बारला सार्वजनिक करमणुकीची जागा म्हणून दिलेला परवाना निलंबित केला जाईल आणि परवानाधारकाला आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर ते निलंबित केल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत आपल्या निलंबनाचा आदेश मागे घेईल किंवा परवाना रद्द करेल. नोंदणी प्रमाणपत्र आणि परवाना रद्द करणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या विरोधात परवाना निलंबना किंवा रद्द करण्याचा आदेश दिल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत राज्य सरकारकडे दाद मागता येईल. त्यावर राज्य सरकारचा निर्णय अंतिम असेल.वरील नियमाप्रमाणे परवाना रद्द झालेल्या व्यक्तीस ज्याने परवाना रद्द केला आहे अशा अधिकाऱ्याकडे विहीत नमुन्यात परवाना शुल्क परत मिळवण्यासाठी अर्ज करता येईल. असा अर्ज आल्यास संबंंधित अधिकारी योग्य चौकशी केल्यानंतर अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीत परवाना शुल्क परत करील. या कलमाखाली शिक्षापात्र अपराध हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असेल. (विशेष प्रतिनिधी)