शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

सोशल मीडियासाठी हवा नवा कायदा

By admin | Updated: March 25, 2015 00:28 IST

माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६ अ कलम रद्द केले हा प्रतिबंधात्मक उपाय ठरणार असला तरीही त्याऐवजी तत्काळ नवा कायदा किंवा नव्या तरतुदी करून सोशल मीडियावर वचक ठेवणारे आणायला हवे होते.

पुणे : माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६ अ कलम रद्द केले हा प्रतिबंधात्मक उपाय ठरणार असला तरीही त्याऐवजी तत्काळ नवा कायदा किंवा नव्या तरतुदी करून सोशल मीडियावर वचक ठेवणारे आणायला हवे होते. गुगल, फेसबुक, ट्विटर यासारख्या कंपन्यांना ना पोलिसांचा धाक राहिला, ना आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त पोस्ट डीलिट करण्यासाठी कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांची धास्ती राहिली नाही. सोशल मीडियाचे मैदान खुले झाल्याने त्याचा गैरवापर होणार हे निश्चित, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.कलम ६६ अ : एखाद्यास बदनामीकारक संदेश पाठविणं - जर एखाद्या व्यक्तीनं बदनामीकारक, खोडकर संदेश किंवा खोटी माहिती पसरविल्यास त्याला ३ वर्षांपर्यंत कैद आणि दंड होऊ शकतो. हे कलम तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आले आहे. याऐवजी तातडीने नवा कायदा आणणे ही शासनाची जबाबदारी आहे. ६६ अमुळे किमान नागरिक काहीही कमेंट करण्यापूर्वी विचार करीत होते. चुकीचे लिहिण्यापूर्वी धजावत नव्हते. आता मात्र कोणाचे काहीही वचक नसल्याने नागरिक बेछूटपणे याचा वापर करीत राहणार हे निश्चित. सोशल मीडियावरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी योग्य पद्धतीने नियमांची बांधणी करून पुन्हा सुधारित कलमाचा कायद्यात समावेश करायला हवा होता. त्यामुळे कलम ‘६६ अ’ आपसूकच रद्द झालं असतं.- प्रो. सपना देव,सायबर लॉमाहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ मध्ये २००८ मध्ये बदल करण्यात आले होते. त्यापूर्वी हे कलम केवळ हॅकिंगशी निगडित होते. मात्र २००८ मध्ये त्यात बदल करून ६६ (अ ते एफ) या कलमांचा अंतर्भाव करण्यात आला. यातील मुद्दे स्पष्ट तसेच संवैधानिक ही नव्हते. या कलमामुळे कोणी लाईक किंवा कमेंट केले तरी त्यांना अटक होत असे. खऱ्या अर्थाने चुकीची विधाने करणाऱ्यांपेक्षा या कलमाचा गैरवापरच वाढलेला होता. मात्र हे कलम रद्द झाल्याने सोशल मीडियावर काहीही आक्षेपार्ह टाकता येईल, असा गैरसमज वापरकर्त्यांनी करू नये, कारण कलम ६६ चे इतर एफपर्यंतचे कलम तसेच अन्य माहिती तंत्रज्ञान कलमांद्वारे अशा कृत्यांवर आळा घालता येणार आहे. - अ‍ॅड. गौरव जाचकसध्या सोशल मीडिया फोफावला आहे. त्यामुळे त्याच्यावर जरब ही हवीच. सामाजिक शांती भंग होण्याच्या अनेक घटना घडत असतात. रिकामटेकडे लोक त्याचा वापर करून शांतता भंग करतात. त्यामुळे नवीन कायदा अस्तित्वात यायला हवा.- अ‍ॅड. प्रताप परदेशी४सोशल मीडियातून एखाद्या महिलेवर अश्लील भाष्य करणारा फोटो किंवा व्यंग्यचित्र पोस्ट केल्यावर संबंधितावर पोलीस कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करणार?४स्वातंत्र्यसैनिक, धर्मगुरू किंवा एखाद्या संघटनेच्या प्रतिष्ठित व्यक्तीविरोधात अतिशय खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी किंवा फोटो पोस्ट कमेंट केली असेल तर पोलीस काय कारवाई करणार?४धर्माशी संबंधित असलेल्या एखाद्या गोष्टीच्या बाजूने किंवा विरोधात लिहिल्याने दंगल उसळली तर काय कारवाई होणार?४प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांविरोधात अर्वाच्च, अश्लील, शिवराळ भाषेत लिहिले गेल्यास काय करणार?