शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा कर्ज घोटाळाही उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:02 IST

मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १२२ कोटींच्या घोटाळ्यापाठोपाठ कर्ज घोटाळाही आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आला आहे. बुधवारी ...

मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १२२ कोटींच्या घोटाळ्यापाठोपाठ कर्ज घोटाळाही आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आला आहे. बुधवारी १२ जणांविरोधात दुसरा गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक चौकशीत न्यू इंडिया बँकेने मीडिया क्षेत्रातील नामांकित पर्सेप्ट ग्रुपला नियमबाह्य ७७ कोटींचे कर्ज मंजूर केल्याचे समोर आले. यामध्ये बँकेचे २४.९३ कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

गौरी आणि हिरेन भानू दाम्पत्याने कर्ज देतानाही गैरव्यवहार करत ४०० कोटींहून अधिकचा घोटाळा केल्याच्या अर्जावरूनही आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली. चौकशीअंती चौकशी अधिकारी प्रदीप आजगेकर यांच्या तक्रारीवरून दुसरा गुन्हा नोंदवला आहे.

यामध्ये तत्कालीन अध्यक्ष रणजित भानू (मयत), हिरेन भानू, सतीश चंदर, उपाध्यक्ष गौरी भानू, एम. डी. दमयंती साळुंखे, माजी सीईओ अभिमन्यू भोअन तसेच, पर्सेप्ट ग्रुपचे संस्थापक हरिंदर पाल सिंग, मुख्य वित्तीय अधिकारी मनोजकुमार पात्रा यांच्यासह सुकेत कुमार पटेल आणि न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे संबंधित संचालक, हार्मिस ग्रुप आणि परसेप्ट ग्रुप कंपनीच्या अन्य संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

प्राथमिक चौकशीमध्ये रणजित, हिरेन, सतीश, गौरी, दमयंती तसेच इतर संचालकांनी पर्सेप्ट ग्रुपचे सिंग, पात्रा व इतर संचालकांसोबत मिळून कट रचून ३ सप्टेंबर २०१४ ते १९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ७७ कोटींचे कर्ज मंजूर करून घेतले. हिरेन, पटेल आणि भोअन यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कर्जातील ६.३७कोटी रक्कम त्यांच्या कंपनीमध्ये हस्तांतर करून घेतली. त्याबदल्यात पर्सेप्ट ग्रुपची कर्ज खाती एनपीए घोषित केल्यानंतर सेटलमेंट करून पर्सेप्टला एकूण १८.५६ कोटी इतकी माफी दिल्याचे समोर आले.

असा केला घोटाळा...१) संचालकांनी खातरजमा टाळून मोठी कर्जे मंजूर केली. काही हप्ते भरल्यानंतर नियोजित कटाप्रमाणे संबंधित व्यक्ती, कंपन्यांनी हप्ते चुकवले. बँकेने त्यांना कर्जबुडव्यांच्या (एनपीए) यादीत टाकले.

२) पुढे कर्जवसुलीच्या निमित्ताने (वन टाइम  सेटलमेंट) या व्यक्ती, कंपन्यांची मोठी रक्कम माफ केली. त्या बदल्यात बँकेच्या संचालक, अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची लाच स्वीकारली. विशेष म्हणजे लाचेची रक्कम व्यावसायिक करारांच्या निमित्ताने उर्वरित कर्जाची (कर्जमाफीनंतरची उर्वरित रक्कम) परतफेड करण्याआधी स्वीकारण्यात आल्याचे पुरावे, व्यवहार हाती लागले आहेत. त्यानुसार तपास सुरू आहे.

३) या प्रकरणात अशाप्रकारे ३ सुमारे २७६ व्यक्ती, कंपन्यांची कर्जे माफ करून ४०० कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा घडल्याचा संशय आर्थिक गुन्हे शाखेला आहे. 

टॅग्स :bankबँकMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र