शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मद्याच्या बाटल्यांवर छापणार नवा इशारा; सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 04:14 IST

अपघात टाळण्यासाठी सांगणार... मद्यसेवन करून वाहने चालवू नका

- खलिल गिरकर मुंबई : मद्यसेवन करून वाहने चालविल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडतात व त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो. असे प्रकार रोखण्यासाठी ‘सुरक्षित राहा, मद्यसेवन करून वाहने चालवू नका’ असा सुधारित वैधानिक इशारा छापण्याचा निर्णय राज्य शासन व राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे घेण्यात आला आहे.मद्यसेवन करून वाहन चालविण्यास संपूर्ण भारतात बंदी आहे. तो गुन्हाच आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांचे लायसन्स अनेकदा रद्द करण्यात येते आणि जबर दंडही आकारण्यात येतो. तरीही लहान-मोठ्या शहरांपासून खेडगावांपर्यंत सर्वत्र दारू पिऊ न लोक वाहने चालवितात, असे आढळून आले आहे. त्यांना पोलिसांनी अडवल्यास त्यांच्याकडून दंडवसुली होईल आणि प्रसंगी लायसन्सही रद्द होईल, पण मद्यपींचे लोकशिक्षक करण्याच्या दृष्टीने मद्यांच्या बाटल्यांवर हा इशारा छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन राजपत्रात १९ सप्टेंबर रोजी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील मद्याच्या सर्व बाटल्यांच्या वेष्टनावर हा वैधानिक इशारा छापण्यात येईल. आतापर्यंत मद्याच्या बाटलीवर ‘मद्यसेवन हे आरोग्यास हानिकारक आहे’ इतकाच वैधानिक इशारा छापण्यात येत होता. मात्र, वाढत्या अपघातांमुळे या इशाºयामध्ये आणखी इशारा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नव्याने बाजारात येणाºया सर्व प्रकारची मद्ये, तसेच वाइन्सच्या बाटल्यांवर, तसेच त्यांच्या बॉक्सेसवर हा इशारा छापण्यात येणार आहे. त्यामुळे मद्य पिणाऱ्यांनाच नव्हे, तर घरच्यांनाही ही गंभीर बाब असल्याचे अधिक तीव्रतेने जाणवेल, असे सरकारला वाटत आहे.महिन्याभरात निर्णयाची अंमलबजावणीदेशी दारू, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, वाइन, बीअर अशा सर्व प्रकारच्या मद्यावर हा वैधानिक इशारा छापण्यात येणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेला मद्यसाठा व उत्पादित करण्यात आलेला मद्यासाठा वगळून पुढील महिन्याभरात या निर्णयाची अंमलबजावणी झालेल्या बाटल्या बाजारात येतील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील अति वरिष्ठ अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.